गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी; २४ तासांत धडकणार चक्रीवादळ

बिपरजॉय चक्रीवादळ हे तीव्र झाले असून ते गुजारतकडे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणारे हे वादळ गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी; २४ तासांत धडकणार चक्रीवादळ

बिपरजॉय चक्रीवादळ हे तीव्र झाले असून ते गुजारतकडे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणारे हे वादळ गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वादळ खूप भीषण स्वरूपाचे असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत ३० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

१५ जून रोजी बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. देशभरात बिपरजॉय चक्रीवादळाचापरिणाम पाहायला मिळत आहे. बिपरजॉय चक्रीवादळानं रौद्र रुप धारण केलं आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात चक्रीवादळामुळे प्रशासन अलर्टवर आहे. अतितीव्र चक्रीवादळ बिपरजॉय गुजरात किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्ट्टी भागात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या भागातील जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.गुजरात सरकारही सतर्क झाले असून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी काल मंगळवारी चक्रीवादळाच्या तयारीची आढावा बैठक घेतली. केंद्र सरकार आणि राज्यांनी मिळून गेल्या ९ वर्षामध्ये अनेक आपत्तींना तोंड दिले आहे. या नवीन आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचं अमित शाह यांनी म्हंटलं आहे.

चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रात उंच लाटा उसळल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग १५० किमी प्रतितास आहे. हे चक्रीवादळ आता वेगाने गुजरातकडे सरकत आहेय. किनारपट्टी भागात तटरक्षक आणि एनडीआरएफ पथकं तैनात करण्यात आली आहेत. हा बिपरजॉय चक्रीवादळाचा ट्रेलर असल्याचं म्हटलं जात आहे. बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे शाह म्हणाले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी लोकांना वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. तर ३० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये पावसाला सुरुवात झाली. यावेळी मोरबी, द्वारका, जामनगर, राजकोट, पोरबंदर येथे मुसळधार आणि अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून त्यामुळे सखल भागात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात नुकसान होण्याची शक्यताही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. वादळामुळे झाडे पडू शकतात, कच्च्या घरांची पडझड होऊ शकते, पक्क्या घरांचंही नुकसान होऊ शकते, तसेच टेलिकॉम आणि रेल्वेच्या कामावरही परिणाम होऊ शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा:

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत मिळणार

मुंबई, ठाणे ,पालघरसह वसईमध्ये देखील पावसाने लावली हजेरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version