spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Hijab Ban : हिजाब प्रकरण ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवलं; कोर्टाच्या निकालात मतभिन्नता झालेल्या निर्णय

कर्नाटकमधील शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम महिला आणि मुलींनी परिधान केलेल्या हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या अनेक याचिकांवर हा आदेश दिल्याने सुप्रीम कोर्टाने गुरुवारी वेगळा निकाल दिला. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पडणार होती. जो आता देशासाठी अत्यंत भावनिक मुद्दा बनला आहे.

खडसेंनी दिले ठाम उत्तर, भाजप प्रवेशाच्या चर्चांना…

हिजाब बंदीच्या मुद्यावरून सुनावणी करणाऱ्या सुप्रीम कोर्टातील दोन सदस्यीय खंडपीठात निकालाबाबत मतभिन्नता असल्याचे दिसून आले. न्या. सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक हायकोर्टाचा निकाल अवैध ठरवला. तर, न्या. हेमंत गुप्ता यांनी हिजाब बंदीचा कर्नाटक सरकारचा निर्णय योग्य ठरवला. त्यामुळे आता हिजाब बंदीचे प्रकरण तीन सदस्यीय न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी जाणार आहे.

हेही वाचा : 

MNS : मनसे नेत्याचे ऋतुजा लटकेंसाठी एक ट्विट चर्चेत म्हणाले, वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा इतकच…

काय म्हणाले दोन वकील?

याचिकाकर्त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात उपस्थित असलेले अधिवक्ता एजाज मकबूल म्हणाले की, सध्या या प्रकरणी कोणताही निर्णय झालेला नाही आणि तो सरन्यायाधीशांसमोर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर ते घटनापीठ किंवा अन्य कोणत्याही खंडपीठाकडे सोपवले जाईल. त्याचवेळी, हिजाबच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला लढणारे वकील वरुण सिन्हा म्हणाले की, एका न्यायमूर्तीने याचिका फेटाळून लावल्याने उच्च न्यायालयाचा निर्णय लागू राहील. आता जोपर्यंत मोठ्या खंडपीठाचा निर्णय होत नाही तोपर्यंत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहणार आहे.

Diwali 2022 : बलिप्रतिपदा हा दिवस का साजरा केला जातो ?

Latest Posts

Don't Miss