Hindi Diwas 2022 : १४ सप्टेंबरला का साजरा केला जातो हिंदी दिवस?

आपण भारतात कुठेही गेलो की आपण हिंदी भाषेला (Hindi Language) प्रथम प्राधान्य देतो. आपल्याला माहित असतं समोरच्याची भाषा कुठलीही असो, त्याला हिंदी कळणारच.

Hindi Diwas 2022 : १४ सप्टेंबरला का साजरा केला जातो हिंदी दिवस?

आपण भारतात कुठेही गेलो की आपण हिंदी भाषेला (Hindi Language) प्रथम प्राधान्य देतो. आपल्याला माहित असतं समोरच्याची भाषा कुठलीही असो, त्याला हिंदी कळणारच. मग दोन वेगवेगळ्या भाषेचे लोक हिंदीवर येऊन एक होतात. आज १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिन (Hindi Diwas) साजरा केला जातो. हिंदी भाषेचं महत्त्व आणि ओळख पटवून देण्यासाठी तसेच हिंदी भाषेचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आज म्हणजेच १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. जगभरात ४२० मिलियन लोक हिंदी भाषा बोलतात. तर आज आपण याच हिंदी दिवसांबद्दल जाणून घेणार आहोत.

हिंदी विषयी बोलताना महात्मा गांधी एकदा म्हणाले होते, ‘हिन्दी भाषेशिवाय मी मुका आहे.’ बाळ गंगाधर टिळक यांनी सुद्धा हिंदी विषयी मत मांडताना म्हटलं होतं, “हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा बनू शकते अशी इच्छा आणि विचार ठेवणाऱ्या लोकांपैकी मी एक आहे.” आजही हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती राजभाषा आहे. देशातील अनेक ठिकाणी ही भाषा बोलली जाते. या भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा आहे. हिंदीसाठी १४ सप्टेंबर ही तारीख खूप खास आहे. १४ सप्टेंबर हा दिवस महान साहित्यिक व्यौहार राजेंद्र सिंह (Vyohaar Rajendra Singh) यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी हिंदी भाषेचं महत्त्व पटवून देण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. यामुळे त्यांचा जन्मदिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो.

हिंदी ही देवनागरी लिपीत लिहिलेली इंडो-आर्यन भाषा आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९४९ पासून दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. हिंदी दिनानिमित्त देशभरात अनेक सांस्कृतिक उत्सव साजरे केले जातात.हिंदी भाषेला १९४९ साली संविधानामध्ये अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली. भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी हिंदी एक महत्त्वाची भाषा आहे. हिंदी दिवसाव्यतिरिक्त, १० जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस देखील साजरा केला जातो. १० जानेवारी १९७५ रोजी नागपुरात पहिली जागतिक हिंदी परिषद पार पडली होती. ज्यामध्ये ३० देशांतील १२२ प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यानंतर २००६ पासून हा दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी २००६ सालापासून जागतिक हिंदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

हिंदी साहित्याचा सन्मान करण्यासाठी आणि हिंदी भाषेबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी हिंदी दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हिंदी दिनानिमित्त मंत्रालय, विभाग, सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीय बँका आणि नागरिक यांना हिंदी भाषेतील योगदानाबद्दल राजभाषा कीर्ती पुरस्कार आणि राजभाषा गौरव पुरस्कार यांसारखे पुरस्कार दिले जातात.

हे ही वाचा :

अखेर शिंदेंच ठरलं, ‘आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर’ मुख्यमंत्र्यांचा निर्धार

सामान्यांना दिलासा, देशात खाद्यतेलाच्या किंमती मोठी घसरण

शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याच्या अडचणीत वाढ, कोर्टाने बाजवली नोटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version