spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अल्पवयीन व्यक्ती Pan Card साठी अर्ज कसा करणार ?

देशातील प्रत्येक सदस्याला कर भरावा लागतो. सदस्य जो कर भरतात त्यातील १० अंकी अद्वितीय ओळख क्रमांक मिळतो ज्याला आपण पर्मनंट अकाउंट नंबर (Payment Account Number-PAN) म्हणतो. लोकांसाठी कॉर्पोरेशन संस्था आणि स्थानिक सरकारसह कर भरणाऱ्या प्रत्येकासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

देशातील प्रत्येक सदस्याला कर भरावा लागतो. सदस्य जो कर भरतात त्यातील १० अंकी अद्वितीय ओळख क्रमांक मिळतो ज्याला आपण पर्मनंट अकाउंट नंबर (Payment Account Number-PAN) म्हणतो. लोकांसाठी कॉर्पोरेशन संस्था आणि स्थानिक सरकारसह कर भरणाऱ्या प्रत्येकासाठी पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. कमी वयातील व्यक्ती पॅन कार्ड साठी अर्ज करू शकतो.भारतात ITR फायलिंगवर नियमानुसार कोणतीही मर्यादा नाही. जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीचे मासिक उत्त्पन्न रुपये पेक्षा जास्त असेल तर तो व्यक्ती ITR सबमिट करू शकतो. १५,००० आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड असणे फार गरजेचे आहे. आयकर विभागाने पॅन कार्ड मिळवण्यासाठी वयाची अट निश्चित केली नाहीं. तुम्हाला प्रश्न तर पडलाच असेल अल्पवयीन व्यक्तींचे पण कार्ड कधी आवश्यक आहे? तर तुम्हाला याचे उत्तर या माहित मध्ये नक्कीच मिळेल.

जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने गुंतवणूक करता आणि तुमच्या मुलाला तुम्ही केलेल्या त्या गुंतवणुकीचा लाभ होत असेल तर त्यासाठी पॅनकार्ड असणे गरजेचे आहे. जर तुमच्या मुलाच्या नावाने बँक खाते उघडण्याचा हेतू असेल तर तुम्हाला पॅनकार्ड असले आवश्यक आहे. अल्पवयामध्ये पहिला पगार असेल तेव्हा पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. कायदेशीर पालकांच्या वतीने पॅनकार्ड अर्ज सादर करावा लागतो. मुलाच्या वतीने ITR सबमिट करण्यासाठी पालकाची हजेरी असणे गरजेचे आहे. त्यासाठी पालक सुद्धा जबाबदार असतो. अल्पवयीन व्यक्तीने बनवलेल्या पॅन कार्ड मध्ये स्वाक्षरी आणि फोटो नसल्यामुळे ते ओळख पत्र म्हणून वापरले जाऊ शकत नाही. व्यक्तीने १८ वर्ष झाल्यांनतर ते पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी सादर करणे आवश्यक आहे.

हा फॉर्म भरण्यासाठी NSDL(National Securities Depository Limited) या वेबसाइटवर जाऊन नेव्हिगेट(navigate) करा. त्यानंतर फॉर्म ४९A भरण्यापूर्वी सर्व दिशानिर्देश काळजीपूर्वक वाचा. पालकसुद्धा या साठी जबाबदार असतो त्या मुळे पालकांच्या फोटोसह इतर कोणत्याही आवश्यक कागदपत्रांस, अल्पवयीन मुलाचे जन्म प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे आहे. पालकाच्या स्वाक्षऱ्या अपलोड करणे गरजेचे आहे. या फॉर्म साठी १०७ रुपये पेमेंट करून प्रक्रिया पुन्हा करा. सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर एक पोचपावती क्रमांक दिला जाईल, जो अर्जाची स्थिती तपासण्यासाठी वापरला जाऊ शकतो. पॅन कार्ड तुम्हाला १५ दिवसांच्या आत वितरित केले जाईल.

हे ही वाचा:

Union Budget 2023 अर्थसंकल्पाने महिलांना दिली मोठी भेट, ७.५% व्याजदर देणाऱ्या ‘या’ योजनेची केली घोषणा

आयकर सवलत मर्यादा ५ लाख रुपयांवरून ७ लाख रुपयांपर्यंत वाढवली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss