मानवाच्या ‘या’ चुकीमुळे जीवन धोक्यात! चक्क पृथ्वी झुकतेय एका बाजूला…

२० वर्षांपेक्षा कमी कालावधीत, पृथ्वी ४. ३६ सेमी/वर्षाच्या वेगाने सुमारे ८० सेमी पूर्वेकडे झुकली गेली आहे. मोठ्या प्रमाणात भूजल काढल्यामुळे पृथ्वी ग्रह पूर्व दिशेकडे कललेला आहे.

मानवाच्या ‘या’ चुकीमुळे जीवन धोक्यात! चक्क पृथ्वी झुकतेय एका बाजूला…

पाणी (Water) हे मानवाचं जीवान असतं. पृथ्वी (Earth) वरील प्रत्येक सजीवाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे. पृथ्वीवरील जीवनात पाण्याचं योगदान सर्वात मोठं आहे. पृथ्वी हा ग्रह फक्त पाण्यामुळेच जिवंत आहे. परंतु आता मानवाने हे पाणी पृथ्वीवरून काढून तिला चक्क एका बाजूला झुकवलं आहे. पृथ्वी एका बाजूने म्हणजेच पूर्वे कडे पूर्णपणे झुकली आहे. आणि हे फक्त मानवामुळे झाले आहे. भविष्यात या गोष्टीतच अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे पूर्ण सजीवांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते.

जिओफिजिकल रिसर्च लेटर्स (Geophysical Research Letters) हे एजीयूचे (AGU) जर्नल आहे. यामध्ये पृथ्वी आणि अंतराळ विज्ञानांसंदर्भात माहिती प्रकाशिते केली जाते. जिओफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, मानवाने पृथ्वीवरून पंपिंग करून मोठ्या प्रमाणात भूजल काढलं आहे. यामुळे २० वर्षांपेक्षा कमी कालावधीत, पृथ्वी ४. ३६ सेमी/वर्षाच्या वेगाने सुमारे ८० सेमी पूर्वेकडे झुकली गेली आहे. मोठ्या प्रमाणात भूजल काढल्यामुळे पृथ्वी ग्रह पूर्व दिशेकडे कललेला आहे. या संशोधन अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी यापूर्वी हवामान मॉडेल्सवर आधारित केलेल्या अंदाजानुसार, मानवाने १९९३ ते २०१० पर्यंत २,१५० गिगाटन भूजल उपसलं, ही समुद्रसपाटीपासून ६ मिलिमीटर अधिक आहे. पण, शास्त्रज्ञांचा हा अंदाज अचूक अंदाज नाही, कारण त्याबद्दल अचूक माहिती देणे जवळजवळ अशक्य आहे.

पृथ्वी एका बाजूने अधिक झुकल्याचा फार मोठा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टी वर होईल. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्या कालावधीवर सुद्धा पृथ्वी कलल्याचा परिणाम होईल. तसेच वर्षभरातील ठरलेल्या ऋतू चक्रावर पण परिणाम होईल, यामुळे हवामान आणि तापमानावर देखील अनेक बदल होतील. असे सुद्धा जिओफिजिकल रिसर्च लेटर्सच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

भर पावसात मुख्यमंत्री पोहोचले वरळीमध्ये, कोस्टल रोडची पाहणी

महाराष्ट्रात पाऊस बरसला, उकाड्याने हैराण नागरिक सुखावले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version