मी माफी मागते: गौतमी पाटील

मी माफी मागते: गौतमी पाटील

गौतमी पाटील एक इंस्टंस्टार आहेत तर ती लावणीही सादर करते , गौतमी पाटील यांनी काल सांगलीत लावणी सादर केली या वेळी प्रेक्षकांनी भरपूर गर्दी केली होती त्यामुळे काही लोक जिल्हा परिषद शाळेच्या कौलांवर जाऊन बसले त्यामुळे ती कौल तुटली आणि कौलावरील सर्व लोक खाली पडलेत या दुर्घटनेत एका वयोवृद्ध व्यक्तीचा मुत्यू झाला या घटने संधर्बात गौतमी पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि सर्वांची माफी मागितली .

पत्रकार परिषदेत गौतमी पाटील यांनी सांगितले कि ” मी माफी मागते, असं गौतमी पाटील हिनं म्हंटलं. गौतमी पाटील ही इंस्टास्टार आहे. लावणीमधून माझ्याकडून चुकीचे आणि अश्लील हावभाव झालेत,”. याबाबत तिनं दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे. गौतमी पाटील यांनी काल सांगलीत लावणी सादर केली. याबाबत गौतमी पाटील म्हणाली,” रेग्युलर शो चालतो तसा शो होता. आम्ही गेलो. तिथल्या लोकांनी आवरायला रूम दिला. शो सुरू झाला.स्टेजवर गेल्यावर कळलं की, खूप लोकं होते. लोकांमध्ये जे घडलं. त्याबद्दल मला पण वाईट वाटते. ज्यांचा मृत्यू झाला ते बिचारे वयस्कर होते. स्टेजवर असताना मला काही माहीत नव्हतं. पण, कार्यक्रम संपल्यानंतर मला कळलं की, वयोवृद्धाचा मृत्यू झाला.

बेडग इथल्या एका मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या आणि बेडग गावचे नाव देशात गाजवणार्‍या मानकऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. नृत्याचा कार्यक्रम सुरु झाला. तिचं नृत्य पाहण्यासाठी जिल्ह्यातून आणि बाहेरुन तिचे चाहते आले होते. कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या पटांगणात तुफान गर्दी झाल्याने काही प्रेक्षक हे शाळेच्या कौलारु छतावर जाऊन नृत्याचा ताल धरु लागल्याने कौलांचा चुराडा झाला. तार जाळीच्या कम्पाऊंडचेही मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर ज्या झाडावर प्रेक्षक बसले होते ते झाडदेखील मुळासह कोसळलं.

हे ही वाचा:

Bigg Boss Marathi 4 : मिरचीची धुरी, पाणी, तेल… टास्कमध्ये होणार खुल्ला राडा!

तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या, तुम्हाला पुढे कसं सुखरुप घरी पाठवायचं हे… ; नितीश राणे

वेदांता प्रकल्पाबाबत RTI अंतर्गत समोर आलेली माहिती चुकीची असल्याचे ठाकरे गटाचा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version