Wednesday, July 3, 2024

Latest Posts

International Plastic Bag Free Day या दिवसाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

दरवर्षी ३ जुलै रोजी ‘आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन’ (International Plastic Bag Free Day) साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील व्यक्ती, समुदाय, आणि व्यावसायिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्यासाठी आठवण करून देतो. सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने बॅग फ्री वर्ल्ड या जागतिक चळवळीने हा उपक्रम सुरु केला होता. प्लास्टिक पिशव्यांच्या पर्यावरणीय परिणामांविषयी चिंता असलेल्या काही संस्था आणि व्यक्तींनी २००८ मध्ये ही मोहीम सुरु केली होती. २००९ साली पश्चिम युरोपमध्ये प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी लावायला सुरु केली. यानंतर २०१३ या वर्षी बॅग्स फ्री वर्ल्ड ऑर्गनिझेशन या संस्थेने ‘आंतरराष्ट्रीय प्लास्टिक मुक्त दिन’ साजरा करायला सुरुवात केली आणि हा दिवस जगभरात लोकप्रिय होत गेला. तसेच २०१५ मध्ये युरोपियन युनियनने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी पहिले पाऊल उचलले. २०२२ मध्ये सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणणारा बांगलादेश पहिला देश बनला. त्यानंतर भारतामध्येही प्लास्टिक बंदी सुरु होताना दिसत आहे.

‘आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन’ साजरा करण्याचे उद्दिष्ट सामूहिक जाणीव निर्माण करणे आणि शाश्वत पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वच्छ व निरोगी पर्यावरणाचे  कार्य करण्यासाठी पावले उचलण्यास प्रोत्साहित करणे हे आहे. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनी प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या पृथ्वीसाठी अधिक शाश्वत भविष्याशी चालना देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना प्रोत्साहन देते. कोणतीही वस्तू खरेदी करताना सिंगल युज प्लास्टिक पिशव्या नाकारणे आणि पर्यावरणपूरक पर्याय निवडण्याची ही एक संधी आहे.

प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी त्याचा कमीत कमी वापर करणे खूप महत्वाचे आहे. तसेच प्लास्टिकच्या पिशव्या ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्यासाठी त्याचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन या दिवशी प्लास्टिकबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी जगभरात संदेश दिले जातात. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होते हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, चमचे, ग्लास आणि प्लेट्स वापरून फेकून दिल्यावर ती वर्षानुवर्षे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा नदी आणि समुद्रात साचत राहतात. त्यामुळे भारतात सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. तरीही प्लास्टिकचा वापर अनेक प्रकारांत होताना दिसतो. या दिवशी स्वयंसेवी गट आणि पर्यावरणवादी संस्था बऱ्याचदा समुद्रकिनारे, उद्याने आणि इतर नैसर्गिक भागातून प्लास्टिक गोळा करण्यासाठी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छता मोहीम आयोजित करतात. प्लास्टिकमुळे होणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि लोकांना किमान त्याचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी ३ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा केला जातो.

 

हे ही वाचा :

Ashadhi Ekadashi 2024:उपवासाची खिचडी तर नेहमी खातो, मग यावेळी करा काहीतरी नवीन…

काळ्या वर्तुळांनी डोळ्यांना घेतलयं ? तर ‘हा’ उपाय नक्की करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss