लाल किल्यावरील भाषणादरम्यान मोदींनी मांडले महत्वाचे मुद्दे

देश आज ७७वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यावेळी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. १४० कोटी लोकांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.

लाल किल्यावरील भाषणादरम्यान मोदींनी मांडले महत्वाचे मुद्दे

देश आज ७७वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यावेळी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. १४० कोटी लोकांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. आज तरुण जे काही करतील, त्याचा देशावर १००० वर्षे प्रभाव पडेल. देशातील तरुणांना हे सौभाग्य लाभले आहे. आम्हाला ते गमवायचे नाही. युवाशक्तीमध्ये क्षमता असून ती मजबूत करण्याची आमची धोरणे असल्याचे मोदी म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकसंख्येच्या बाबतीत आपण पहिल्या क्रमांकाचा देश आहोत. एवढ्या विशाल देशाचे आमचे कुटुंबीय, आज आपण स्वातंत्र्याचा सण साजरा करत आहोत. देश आणि जगात भारतावर प्रेम करणार्‍या आणि त्यांचा आदर करणार्‍या करोडो लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या कुटुंबातील सदस्य पूज्य बापूंच्या नेतृत्वाखाली त्याग करणाऱ्या वीरांना मी नमन करतो. त्या पिढीत क्वचितच कोणी असेल, ज्याने आपले योगदान दिले नसेल. ज्यांनी योगदान दिले आहे, त्याग केला आहे, तपश्चर्या केली आहे. त्या सर्वांना मी आदरपूर्वक नमन करतो. तसेच देश मणिपूरच्या लोकांसोबत आहे, आता शांततेच्या बातम्या येत आहेत. या समस्येवर शांततेतून तोडगा काढणार आहोत, असे मोदी म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी काही ठळक मुद्दे देखील मांडले .

सध्याच्या स्थतीला देशात मणिपूर मध्ये झालेला घटनाक्रम बघता देश मणिपूरच्या लोकांसोबत आहे असे ठाम मत नरेंद्र मोदी यांनी मांडले. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीने देशाच्या अनेक भागांमध्ये संकटे निर्माण केलीपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “यावेळी नैसर्गिक आपत्तीने देशाच्या अनेक भागांमध्ये अकल्पनीय संकटे निर्माण केली आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तरुणांना सल्ला संधींची कमतरता नाही. आपल्याला पाहिजे तितक्या संधी देण्यास देश सक्षम आहे. देशात माता-भगिनींच्या शक्तीची विशेष भर पडत आहे. ही तुमची मेहनत आहे. शेतकऱ्यांची शक्ती जोडली जात आहे, देश कृषी क्षेत्रात पुढे जात आहे. मला मजुरांचे आणि कष्टकऱ्यांचे अभिनंदन करायचे आहे. मोदी म्हणाले, आपण जो काही निर्णय घेऊ, ते हजार वर्षे आपली दिशा ठरवणार आहे. मी देशाच्या सुपुत्रांना सांगू इच्छितो की, आज जे भाग्य लाभले आहे, ते क्वचितच कोणाच्या नशिबी आले आहे. चुकवू नका. माझा युवाशक्तीवर विश्वास आहे. आज माझ्या तरुणांनी जगातील पहिल्या तीन स्टार्टअप इकोसिस्टममध्ये स्थान दिले आहे. भारताची ही ताकद पाहून जग आश्चर्यचकित होत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताने जे आश्चर्य केले आहे ते केवळ दिल्ली-मुंबई-चेन्नईपुरते मर्यादित नाही. छोट्या शहरातील तरुणही नाव कमवत आहेत. देशाची क्षमता दिसून येते. जागतिक व्यवस्थेचा निर्णय घेण्यासाठी भारताची ताकद आणि आत्मविश्वास नवीन उंचीवर जात आहे. आज देशाला G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहेत्यामुळे या संधीचा चांगलाच फायदा आपल्या देशासाठी होणार असल्याचे देखील मोदी यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी म्हणाले, २०१४ मध्ये तुम्ही मजबूत सरकार बनवले. २०१९मध्ये तुम्ही सरकार स्थापन केले. त्यामुळे मोदींना सुधारणा करण्याची हिंमत आली. यातूनही परिवर्तन दिसून येते. १००० वर्षांपर्यंत आपले भविष्य घडवणाऱ्या बदलाला प्रोत्साहन देण्याची आमची दृष्टी आहे. आपली युवा शक्ती भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी होईल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुधारणा करा, परफॉर्म करा आणि देश बदलाहा माझा विचार आहे आणि त्याच विचारावर मी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करता आहे. येणारी युवा पिढी हीच आपल्या देशाची पुढची वाटचाल आहे त्यामुळे मी युवा पिढीला प्रोत्साहन मिळेल या कडे लक्ष देत आहे,.ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना लागू करणार आहे. त्यामुळे अनेक योजनांचा लोकांना फायदा ओनर आहे आणि झाला देखील आहे असे देखील मोदी म्हणाले. पारंपारिक कौशल्य असलेल्यांसाठी पुढील महिन्यात सरकार १३००० ते १५००० कोटी रुपयांच्या वाटपासह विश्वकर्मा योजना सुरू करेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली.देश भ्रष्टाचाराचा राक्षसाच्या तावडीत सापडलेला होता. २०१४ मध्ये जेव्हा आपण सत्तेत आलो तेव्हा जागतिक आर्थिक व्यवस्थेत आपण १० व्या क्रमांकावर होतो. आज १४० कोटी भारतीयांच्या प्रयत्नाने आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत, असं झालं नाही. परंतु आम्ही गळती थांबवली आणि एक मजबूत अर्थव्यवस्था निर्माण केली,” असे मोदी म्हणाले.

भारत ही लोकशाहीची जननी आहे. अनेक भाषा आहेत. पुढे जायचे आहे. मी देशाच्या ऐक्याबद्दल बोलतो, मणिपूरमध्ये हिंसाचार होत आहे तर महाराष्ट्रात दु:ख आहे. आसाममध्ये पूर आहे, केरळमध्ये दुःख आहे. आपल्या मुलींवर अत्याचार होऊ नये ही आपली सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.आमच्या मुलींची सुरक्षा ही सामाजिक-कौटुंबिक जबाबदारी आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास देशाला पुढे नेईल एक गोष्ट जी देशाला पुढे नेईल ती म्हणजे महिलांच्या नेतृत्वाखालील विकास असे मोदी म्हणाले. भारताची एकता टिकवण्यासाठी माझी भाषा किंवा माझ्या पावलांनी भारताच्या एकात्मतेला धक्का पोहोचणार नाही, या विचाराने पुढे जायचे आहे. आपण सर्वांनी एकतेच्या भावनेने पुढे जायचे आहे. आपला देश विकसित देश म्हणून बघायचा असेल तर श्रेष्ठ भारत जगावा लागेल. नरेंद्र मोदी म्हणाले, दहशतवादी हल्ल्यांमध्ये घट झाली आहे. नक्षलवादी घटना कमी झाल्या आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात २. ५ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचेल, आम्ही जल जीवन मिशनवर २ लाख कोटी रुपये खर्च केले आहे, असे देखील मोदी म्हणाले. आम्ही आयुष्मान भारत योजनेंतर्गत ७० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत, जेणेकरून गरिबांना औषधे मिळतील, त्यांना चांगले उपचार मिळावेत. पशुधन वाचवण्यासाठी आम्ही लसीकरणासाठी सुमारे १५हजार कोटी रुपये खर्च केले अशाप्रकारच्या योजना आम्ही राबवत आहोत.

हे ही वाचा:

समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचे काम पंतप्रधानांनी केले, फडणवीस

पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून तरी खोटं बोलू नये एवढीच अपेक्षा, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version