spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Imran Khan Firing : इम्रान खान यांच्या हल्लेखोराची कबुली म्हणाला, ‘मैं मारना चाहता था…’ व्हिडीओ झाला व्हायरल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या गोळीबारात माजी पंतप्रधान इम्रान खान देखील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पाकिस्तानच्या एआरवाय वृत्तसंस्थेनं दिली आहे. इम्रान खान यांच्यासोबतच आणखी चार व्यक्ती गोळीबारात जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्याप्रकरणी सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना अटक केली होती, मात्र आता एक हल्लेखोर ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. नावेद असे ठार झालेल्या हलमावारचे नाव आहे. पोलिसांनी पकडलेल्या दुसऱ्या हल्लेखोराने सांगितले की, “त्याला इम्रान खानला मारायचे होते आणि तो हल्ला करण्यासाठी मामूची मोटरसायकल घेऊन आला होता.”

T20 World Cup 2022 : सेमी फायनलसाठी पाकिस्तानचा मार्ग मोकळा आता भारताचं काय ?

इम्रान खानच्या हल्लेखोराने पोलिसांना सांगितले की, इम्रान खान लोकांची दिशाभूल करत असल्याने त्याने हलमा केला. तो म्हणाला, “मी हा हल्ला केला कारण इम्रान लोकांची दिशाभूल करत होता आणि मला ही गोष्ट दिसली नाही. म्हणूनच मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, मला फक्त इम्रान खानला मारायचे होते आणि इतर कोणालाही नाही.

हेही वाचा : 

पाकिस्तानच्या रॅलीत इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर भारत बारीक लक्ष ठेवून आहे: परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

तो पुढे म्हणाला, “मी इम्रानला मारण्याचा विचार केला कारण तिथे अजान होते आणि तो दुसऱ्या बाजूला डीजे लावून आवाज करत होता.” हल्लेखोराने सांगितले की, त्याने इम्रान खानला मारण्यासाठी अचानक योजना आखली. त्याने सांगितले की, “ज्या दिवशी त्याने लाहोर सोडले, तेव्हा मला वाटले होते की त्याला सोडायचे नाही.” हल्लेखोराने सांगितले की त्याच्या मागे कोणी नाही. तो म्हणाला, “मी मोटरसायकल वर होतो आणि मामूच्या दुकानात उभी केली होती.”

इम्रान खान यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असद उमर यांनी एआरवाय न्यूजला सांगितले की, हल्ल्यात नऊ जण जखमी झाले असून स्थानिक नेते अहमद चथा यांच्यासह दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. उमर म्हणाला, ‘खानला रस्त्याने लाहोरला नेले जात आहे. त्याची प्रकृती चिंताजनक नसली तरी त्याला गोळी लागली आहे. ते म्हणाले की, खान यांचे प्रतिस्पर्धी पाकिस्तान बदलताना पाहू शकत नाहीत. या हल्ल्यासाठी त्यांनी कोणालाही जबाबदार धरले नाही.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानवर जीवघेणा गोळीबार हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार इम्रान खान यांनी सध्या पाकिस्तानात ‘आझादी मोर्चा’ काढला आहे. सरकार विरोधी लढ्यात ते रस्त्यावर उतरले आहेत आणि निदर्शनं करत आहेत. ज्या दिवसापासून इम्रान खान तोशखाना प्रकरणात दोषी ठरवले गेले आहेत. तेव्हापासूनच त्यांनी आझादी मोर्चाला सुरुवात केली आहे. याच अंतर्गत गुरुवारी वजिराबाद येथे मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. यात स्वत: इम्रान खान देखील सहभागी झाले होते.

Latest Posts

Don't Miss