Anant – Radhika यांच्या लग्नात पाहुण्यांना मुंबईतूनच दिसणार बनारसचा घाट, भारतीय संस्कृती, सभ्यता, अध्यात्म, लोककला,संगीत…

अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या लग्नाची देशभरात चर्चा होत आहे. एखाद्या शाही विवाह सोहळ्यासारखाच हा विवाह सोहळा मुंबईच्या बीकेसी (BKC) येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये (Jio World Center) होत आहे.

Anant – Radhika यांच्या लग्नात पाहुण्यांना मुंबईतूनच दिसणार बनारसचा घाट, भारतीय संस्कृती, सभ्यता, अध्यात्म, लोककला,संगीत…

अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या लग्नाची देशभरात चर्चा होत आहे. एखाद्या शाही विवाह सोहळ्यासारखाच हा विवाह सोहळा मुंबईच्या बीकेसी (BKC) येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये (Jio World Center) होत आहे. या लग्नात आधुनिकतेची झलक दिसत आहे. मात्र, जुन्या परंपराही जपल्या जात आहे. त्यामुळेच अनंत आणि राधिका यांच्या लग्नात पाहुण्यांना मुंबईतूनच बनारसच्या घाट दिसणार आहे. अनंत राधिकाच्या लग्नात भारतीय संस्कृती, सभ्यता, अध्यात्म , भारतीय लोककला, कारागिरी, संगीत, पदार्थ यासह अनेक खास गोष्टी दिसणार आहेत.

अनंत आणि राधिकाच्या लग्नात केलेली सजावट ही ‘ॲन ओड टू वाराणसी’ या थीमवर आधारित आहे. ‘वाराणसी’ (Varanasi) या प्राचीन शहराची परंपरा, धार्मिकता, संस्कृती, कला, हस्तकला आणि बनारसी खाद्यपदार्थ यांचे दर्शन लग्नात होत आहे. लग्नात बनारसी चाट, बांगड्याचे दुकान, कठपुतळीच्या शोसह पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे. येथे पाहुण्यांसाठी बनारसी जेवणाचाही बेत आखला आहे.

अंबानी कुटुंबियांच्या या लग्नठिकाणी पोहोचल्यावर पाहुण्यांना बनारसी परंपरा आणि अध्यात्माशी जोडण्याची संधी मिळेल. तसेच या शहरातील खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. प्रत्येक पाहुण्यांना भोजनाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. लग्नाला येणारे सर्व पाहुणे या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतील. तसेच जाताना बनारसच्या घाटांच्या आठवणीही सोबत घेऊन जातील.

हे ही वाचा:

अंबानींची लहान सून म्हणजे सौंदर्याची खाण, तर ३ वाजता वरात, ८ वाजता वरमाळा.. अनंत-राधिकाच्या लग्नाचं संपूर्ण शेड्युल

मेरे यार की शादी है…!, Anant-Radhikaच्या लग्नात Arjun Kapoorची युनिक स्टाईल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version