spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गुगलला आणखीन एक मोठा धक्का, कोर्टाने ठोठावला ७० कोटी रुपयांचा दंड

जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलला आता आणखीन एक मोठा धक्का बसला आहे.

जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलला आता आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. एका अमेरिकन कोर्टाने सुमारे ७०० दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला आहे. यातील ६३० दशलक्ष डॉलर १०० दशलक्ष लोकांमध्ये वाटले जाणार आहेत. तसेच ७० दशलक्ष डॉलर निधीमध्ये जमा करण्यात येणार आहेत. कंपनीवर अँड्रॉइड प्ले स्टोअरचा गैरवापर करून वापरकर्त्यांकडून जास्त पैसे वसूल केल्याचा आरोप करण्यात आला होता.

अल्फाबेटच्या मालकीच्या Google Inc. वर ग्राहकांकडून जास्त शुल्क आकारल्याचा आरोप होता. अँड्रॉईड प्ले स्टोअरवर अॅपमधील खरेदी आणि इतर निर्बंध लादून कंपनी हे पैसे गोळा करत होती. मात्र, गुगलने असे कोणतेही अन्यायकारक माध्यमाचा वापर केला नाही . पण, तिने लोकांना दंड भरण्याचे मान्य केले. तसेच प्ले स्टोअरवर चांगली सुविधा देण्याचे मान्य केले आहे.वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने कंपनीला ७०० दशलक्ष डॉलर भरण्यास सांगितले आहे. यापैकी, ६३० दशलक्ष डॉलर अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये पसरलेल्या १० कोटी लोकांमध्ये वितरित केले जातील. याशिवाय डीसी, पोर्तो रिको आणि यूएस व्हर्जिन आयलंडमध्येही पैसे दिले जातील. सप्टेंबरमध्येच हा करार झाला होता. पण, ही बातमी नुकतीच समोर आली आहे. सध्या हा तोडगा न्यायाधीशांच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, एकूण १० कोटी वापरकर्त्यांपैकी ७ कोटी लोकांना गुगलकडून पैसे घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे करण्याची गरज भासणार नाही. त्यांना आपोआप नुकसान भरपाईची रक्कम मिळेल. १६ ऑगस्ट २०१६ ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान ज्या लोकांनी हे अॅप्स खरेदी केले आहेत किंवा प्ले स्टोअरवरून कोणतेही अॅप खरेदी केले आहे त्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

गुगलचे अॅप व्यवसाय स्पर्धेच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. मात्र, गुगलने अमेरिकन ग्राहकांसाठी चॉइस बिलिंग सुरु केल्याचे म्हटले आहे. आम्ही ग्राहकांना हे अॅप्स गेम आणि इतर प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्याचा पर्याय दिला आहे. गुगलवर डेव्हलपरला प्ले स्टोअर वापरण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

तुमच्या घरात देखील लहान मुलं असेल तर ‘या’ गोष्टी नक्की शिकवा, मेंदू होईल तीक्ष्ण आणि मजबूत

पुण्यातील भाजप नेत्याने उचलले टोकाचे पाऊल, रेल्वेखाली आत्महत्या करत संपवले जीवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss