बेंगळुरूमध्ये न्यूड फोटो व्हायरल केल्यामुळे पत्नीने घेतला नवऱ्याचा जीव

पण त्याच्या शरीरावरील जखमेच्या खुणा पाहता पोलिसांनी त्याचा मृत्यू अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवला.

बेंगळुरूमध्ये न्यूड फोटो व्हायरल केल्यामुळे पत्नीने घेतला नवऱ्याचा जीव

बंगळुरूतील (Banglore) २७ वर्षीय डॉक्टरच्या मृत्यूच्या केसला आता एक नवे वळण आले आहे. या केस मध्ये त्याच्या पत्नीने तिचा बदला घेण्यासाठी त्याचा खून केल्याची बाब समोर येत आहे.

डॉक्टर विकास राजन याने युक्रेन मधून आपले एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर चेन्नईमध्ये काही काळ मेडिकलची प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर तो नोकरीकरिता बंगळूरूमध्ये शिफ्ट झाला. एका प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये नोकरी करत असताना तो विद्यार्थ्यांना मेडिकलची संबंधित विविध विषय देखील शिकवत होता.

दोन वर्षांपूर्वी त्याची भेट प्रतिभाशी झाली जी पेशाने एक आर्किटेक्ट होती. या दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर दोघेही लिव इन् रिलेशनमध्ये राहू लागले आणि काही काळातच त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबांनी देखील पाठिंबा दिला.

 

पण एका आठवड्यापूर्वीच डॉक्टर राजनला खूप मोठी दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असतानाच तो कोमात गेला आणि त्यानंतर तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. पण त्याच्या शरीरावरील जखमेच्या खुणा पाहता पोलिसांनी त्याचा मृत्यू अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवला.

राजांच्या मृत्यूच्या केसचा खोलवर तपास करता राजांची पत्नी प्रतिभा आणि तिच्या मित्रांनी राजनचा छळ करून त्याची तब्येत फारच बिघडल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची बाब समोर आली आहे.

राजनच्या खुनामागचं कारण काय?

अलीकडेच प्रतिभाला तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच डॉक्टर विकास राजनच्या एका इंस्टाग्राम अकाउंट वर तिचे न्यूड फोटो दिसले. याबाबत तिने विकासला विचारले असता “हे एक प्रायव्हेट अकाउंट आहे आणि माझ्या मजेसाठी मी हे न्यूड फोटो इथे पोस्ट करतो” असे उत्तर त्याने तिला दिले. विकास हे उत्तर ऐकल्यानंतर प्रतिभाला फार राग आला आणि त्यानंतर तिने त्याला धडा शिकवण्याचा निश्चय केला.

विकासला धडा शिकवण्याचा प्लॅन आखत प्रतिभाने आपल्या तीन मित्रांना जमा केले आणि त्यांच्या घरी ती विकास घेऊन गेली. थोडी दारू प्यायला नंतर विकास आणि प्रतिभा मध्ये न्यूड फोटोज वरून वाद सुरू झाला. हा वाद इतक्या विकोपाला पोहोचला की प्रतिभा आणि तिच्या मित्रांनी फरशीने विकासवर हल्ला केला आणि त्यात तो फार गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

आपली चूक लपवण्यासाठी प्रतिभा पोलिसांशी खोटं बोलली आणि आपला गुन्हा पोलिसांपासून तिने लपवला. पण आता ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी प्रतिभा आणि गौतम, सुशील, सुनील या तिच्या तिन्ही मित्रांना अटक केली आहे.

हे ही वाचा:

‘पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा’…

पत्राचाळ घोटाळ्याप्रकारणी ईडीचा मोठा खुलासा, माजी मुख्यमंत्र्यांचा हात?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version