Indigo Flight मध्ये ६ महिन्यांच्या बाळाला जाणवू लागला हदयविकाराचा त्रास

इंडिगो एअरलाईन्सच्या रांची ते दिल्ली या प्रवासामध्ये अचानक एक घटना घडली. हे विमान ३० फूट उंचीवर गेल्यानंतर विमानातील एका सहा महिन्याच्या बाळाची अचानक तब्येत बघडली.

Indigo Flight मध्ये  ६ महिन्यांच्या बाळाला जाणवू लागला हदयविकाराचा त्रास

इंडिगो एअरलाईन्सच्या रांची ते दिल्ली या प्रवासामध्ये अचानक एक घटना घडली. हे विमान ३० फूट उंचीवर गेल्यानंतर विमानातील एका सहा महिन्याच्या बाळाची अचानक तब्येत बघडली. हदयविकाराचा त्रास (Heart Patient) असलेल्या अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला (Baby) अचानक विमानात श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यावेळी त्या विमानात डॉ. नितीन कुलकर्णी हे देखील प्रवास करत होते. त्यानांतर त्यांनी बाळावर उपचार केले आणि त्याचा जीव वाचवला. डिगो फ्लाईटक्रू मेबर्सने सर्तकता दाखवत अनाऊंसमेट केली आणि विमानात कोणी डॉक्टर असल्यास बाळावर उपचार करण्याचं आवाहन केले.

डॉ. नितीन कुलकर्णी हे इंडिगोच्या विमानाने प्रवास करत होते. विमानात अनाऊंसमेट केल्यानंतर प्रसंगावधान दाखवत त्यांनी बाळावर उपचार केले आणि त्याचा जीव वाचवला. इंडिगो एअरलाईन्सच्या रांची ते दिल्ली फ्लाईटमध्ये ही घटना घडली. विमान ३० फूट उंचीवर गेल्यानंतर बाळाची तब्येत अचानक बिघडली. केबिन क्रूने अनाऊंसमेंट करत विमानामध्ये डॉक्टर उपस्थित असल्याची विचारणा केली. यावेळी डॉ. नितीन कुलकर्णी आणि डॉ. मोजम्मिल फिरोज यांनी बाळावर उपचार करत मदत केली.बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर बाळाचे पालक घाबरले. त्यानंतर आयएएस अधिकारी नितीन कुलकर्णी आणि डॉ. मोजम्मिल फिरोज यांनी बाळावर उपचार केले आणि त्याचा जीव वाचवला. विमानातील ऑक्सिजन आणि इतर उपलब्ध औषधांच्या साहाय्याने डॉक्टरांनी बाळावर उपचार करायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू बाळाची प्रकृती सुधारली आणि त्याला बरे वाटू लागले. एक तासानंतर विमान लँड झाल्यावर बाळाला वैद्यकिय पथकाच्या देखरेखी खाली नेण्यात आले आणि ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला.

झारखंडमधील हजारीबाग येथे बाळाचे कुटुंबीय राहतात. बाळाला जन्मापासूनच हृदयविकाराचा त्रास आहे. त्याच्या उपचारासाठी त्याला दिल्लीला घेऊन जात होते. आयएएस अधिकारी नितीन कुलकर्णी यांनी सांगितलं की, बाळाचे कुटुंबीय त्यांच्यासोबत डेक्सोना इंजेक्शन घेऊन गेले होते, यामुळे उपचारामध्ये मोठी मदत झाली. इंजेक्शन आणि ऑक्सिजन लावल्यानंतर बाळाच्या तब्येतीमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली. बाळाला जीवदान दिल्याबद्दल विमानामधील इतर प्रवाशांनी दोन्ही डॉक्टरांचे कौतूक केले.

Exit mobile version