spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Indian Army मोठी बातमी! भारतीय सैन्याची बस दरीत कोसळली, १६ जवानांचा मृत्यू

सिक्किममध्ये लष्करी वाहनाचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आज (२३ डिसेंबर) शुक्रवारी एक बस दरीड कोसळली, या अपघातात एकूण १६ जवानांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर आता बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी लष्कराच्या ३ गाड्या जवानांना घेऊन जात होत्या. हा ताफा चाटणहून थांगूच्या दिशेने निघाला होता. गेमा येथे जात असताना वळणावर तीव्र उतार असल्याने वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन खोल दरीत कोसळले. माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. ४ जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ सैनिकांचा मृत्यू झाला. भारतीय लष्कराने या दुर्घटनेवर एक निवेदन देखील जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

IPL Auction 2023 ला सुरवात, ‘या ‘ खेळांडूवर सुरु आहे कोट्यावधी रुपयांची बोली, जाणून घ्या अपडेट एका क्लिकवर…

Latest Posts

Don't Miss