वाहन विक्रीच्या बाबतीत ‘या’ कंपनीने हुंडाईला मात देत पटकावला दुसरा क्रमांक

वाहन विक्रीच्या बाबतीत ‘या’ कंपनीने हुंडाईला मात देत पटकावला दुसरा क्रमांक

वाहन विक्री कंपंन्यांसाठी २०२२ हे वर्ष बऱ्यापैकी फायद्याचच ठरलं आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात २०२० ते २०२१ हा काळ जगभरातील सर्वच कंपन्यांसाठी आर्थिक दृष्ट्या लाभदायी नव्हता. पण २०२२ हे वर्ष काही वाहन विक्री कंपन्यांसाठी चांगलच फायदेशीर ठरलं आहे. दरवर्षीप्रमाणेच २०२२ ला मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही कंपनी वाहन विक्रीत प्रथम क्रमांकवर आहे. वाहन विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या कंपनीला मागे टाकणं हे इतर कंपन्यांसाठी थोडं अवघडच आहे. पण मुख्य म्हणजे वाहन विक्रीच्या बाबतीत बऱ्याच मोठ्या कालावधीपासून दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या हुंडाई (hyundai) ही कंपनी २०२२ मध्ये वाहनविक्रीत तिसऱ्या क्रमांकावर आली असून, टाटा मोटर्स (Tata Motors) ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. नववर्ष कसं असणार तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात? Yearly Horoscope 2023 - पंडित राजकुमार शर्मा २०२१ मध्ये मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या कंपनीने केलेल्या वाहन विक्रीच्या तुलनेत २०२२ या वर्षी ९.९१ टक्क्यांनी घट झाली आहे. पण तरी देखील मारुती सुझुकी ही कंपनी वाहन विक्रीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. २०२२ च्या ऑक्टोबर आणि नव्हेंबर महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री झाली होती. त्याचबरोबर डिसेंबर २०२२ मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे. टाटा मोटर्स (Maruti Suzuki) या कंपनीच्या वाहनांची विक्री ही २०२१ च्या तुलनेत तब्बल १० टक्क्यांनी वाढली आहे. याचे कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वाहनांची वाढती लोकप्रियता, असे सांगण्यात येत आहे. कारण २०२२ मध्ये टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत २०२१ च्या तुलनेत ६४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीची संख्या ही २,३५५ इतकी होती, तर २०२२ मध्ये टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीची संख्या ३,८६८ इतकी नोंदवण्यात आली आहे. हुंडाई या कंपनीच्या वाहनांच्या विक्रीत २०२१ या वर्षाच्या तुलनेत २०२२ मध्ये तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाली असून सुद्धा कंपनी दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. २०२१ मध्ये हुंडाई या कंपनीने ४८,९३३ इतकी वाहन विक्रीची नोंद केली होती. तर २०२२ मध्ये हुंडाई ने ५,५२,५२२ इतकी वाहन विक्रीची संख्या नोंदवली असून वाहन विक्रीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

हे ही वाचा:

अजित पवार यांच्या विरोधात भाजपा आक्रमक, प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर होणार ‘अपसंपदा’कडून कारवाई? केंद्राला सुप्रीम दिलासा, नोटबंदी सरसकट अयोग्य ठरविली जाऊ शकत नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version