मणिपूरमध्ये प्रकरणामध्ये आता सर्वाच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये दिली ताकीद

संपूर्ण जगामध्ये मणिपूर (Manipur) महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हिडिओमुळे आता एकच खळबळ माजली आहे.

मणिपूरमध्ये प्रकरणामध्ये आता सर्वाच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये दिली ताकीद

संपूर्ण जगामध्ये मणिपूर (Manipur) महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हिडिओमुळे आता एकच खळबळ माजली आहे. मणिपूर महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हिडिओमुळे या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणामध्ये आता सर्वाच्च न्यायालयाने (supreme court) कठोर शब्दांमध्ये ताकीद दिली आहे. मणिपूर घटनेवर सर्वाच्च न्यायालयाने यावर म्हंटले आहे की, ” जर यावर सरकारने कठोर कारवाई केली नाही तर आम्ही यावर निर्णय घेऊ.” मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ हा अत्यंत त्रासदायक आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सरकारला या घटनेवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मणिपूर घटनेवर सर्वाच्च न्यायालयाने कारवाईचे निर्देश देत राज्य सरकारला अहवाल देखील सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाच्या संदर्भामध्ये पुढील आठवड्यात शुक्रवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं की, हिंसाचार सुरु असणाऱ्या क्षेत्रामध्ये महिलांचा वापर एखाद्या वस्तूसारखा केला जात आहे. तसेच या घटनेतील दोषींवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली आहे या माहिती देण्याचे निर्देशही सरन्यायाधीशांनी दिले आहेत.

मागील अनेक दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच आहे. याचदरम्यान एक व्हिडीओमुळे देशभरामध्ये खळबळ माजली आहे. दोन महिलांचं भररस्त्यामध्ये विवस्त्र धिंड काढण्यात आली. त्यानंतर या महिलांवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.ही घाट इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कंगपोकपी जिल्ह्यात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना ४ मे रोजीची असल्याची माहिती आहे. आता या प्रकराणात राज्य सरकारकडूनही कठोर भूमिका घेण्यात येत आहे. या प्रकराणातील दोषींचा शोध घेण्यात येत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

Mumbai Local मधून प्रवास करणाऱ्यां ज्येष्ठांसाठी खूशखबर, आता…

लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल Gigi Hadid ला अटक

इर्शाळवाडी दुर्घटनेवर देवंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, अपघातग्रस्तांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version