spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आरबीआयच्या रेपो दारात वाढ

(RBI Repo Rate) आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय हा घेतला आहे. आज, शुक्रवारी रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ करण्यात आली आहे.

मुंबई  –  (RBI Repo Rate) आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय हा घेतला आहे. आज, शुक्रवारी रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो रेट ५.४ टक्के इतका झाला आहे. या रेपो दरात वाढ केल्याने गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीत ५० बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले.

आधीच राज्यात महागाईने त्याचे डोके वर काढले आहे आणि ऐन सणांच्या दिवसांत आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे. त्यामुळे खरेदीवर नियंत्रण येईल. त्याच्या परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते. भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक हि मागील तीन दिवसांपासून सुरु होती. आज आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर झाले. भारतीय अर्थव्यवस्था महागाईशी झुंज देत असून गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातून १३.३ अब्ज डॉलर्स इतके भांडवल बाहेर गेले असल्याचेही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी महागाईबाबत आरबीआयने चिंता व्यक्त केली.

आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतील त्यांनी अनेक मुद्दे मांडले. त्यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय अर्थव्यवस अर्थव्यवस्थेची स्थिती ही मजबूत आहे. त्याच बरोबर रेपो दरात ०. ५० टक्क्यांनी वाढ केली आहे आणि हे व्याज दर तात्काळ लागू करण्यात येणार आहे. एसडीएफ दर ५.१५ टक्क्यांवर करण्यात आले आहेत, तर मार्जिनल स्टॅण्डिंग फॅसिलिटी दर ५.१५ टक्क्यांहून ५.६५ टक्के केले आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहेत. मान्सून सामान्य राहिल्यास आणि कच्च्या तेलाच्या किंमती १०५ डॉलर प्रति बॅरल राहिल्यास चालू आर्थिक वर्षात महागाई दर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे तर दुसरीकडे घरात उपयोगी असणाऱ्या खाद्य तेलाच्या किंमतीत आणखी घट बघायला मिळणार आहे.

रेपो रेट म्हणजे काय?
नियमित व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. हे अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात.

 

हे ही वाचा : – 

खाद्यातेलांच्या किमतींबाबत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Latest Posts

Don't Miss