spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पाकिस्तानच्या रॅलीत इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर भारत बारीक लक्ष ठेवून आहे: परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात इम्रान हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयाता दाखल करण्यात आले आहे. इम्रान खान यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं समोर आलं असून त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर केवळ पाकिस्तानच नव्हे तर जग हादरलं आहे.

यावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (MEA) गुरुवारी पंजाब प्रांतातील वजिराबाद येथील रॅलीदरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर झालेल्या गोळीबारावर बारीक नजर ठेवेल आहे, सांगण्यात आलं आहे. या घटनेत खान यांच्या पायाला बंदुकीतून गोळी लागल्याने दुखापत झाली. गोळीबारात त्यांचे सहकारी आणि पाकिस्तानी सिनेटर फैसल जावेद खान हेही जखमी झाले आहेत. आज ३ नोव्हेंबर रोजी ‘हकीकी आझादी मार्च’ हा मोर्चा वजिराबाद शहरात पोहचला. जफरअली खान चौकात हा मोर्चा आला असताना गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत अन्य चार जण जखमी झाले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “हि नुकतीच घडलेली बातमी आहे. आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि आम्ही चालू घडामोडींवर लक्ष ठेवू. त्यापलीकडे सांगण्यासारखे काहीही नाही कारण ही फक्त एक विकसनशील कथा आहे.” शेजारील राष्ट्राकडून मिळालेल्या ताज्या वृत्तानुसार, खान यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत असून त्यांना उपचारासाठी लाहोरला नेण्यात येत आहे. इमरान खान यांना दुखापत झालेली नाही. त्यांच्या पायाला गोळी लागली आहे,” असे पक्षाचे अधिकारी असद उमर उमर यांनी पत्रकारांना सांगितले.

हे ही वाचा :

महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगणारे संभाजी भिडे समाजातली विकृती; नाना पटोले

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानवर जीवघेणा गोळीबार हल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss