Global Hunger Index 2022 : जागतिक उपासमार निर्देशांकात भारत १०७ व्या क्रमांकावर, पाकिस्तान, बांग्लादेश नेपाळही भारताच्या पुढे

Global Hunger Index 2022 : जागतिक उपासमार निर्देशांकात भारत १०७ व्या क्रमांकावर, पाकिस्तान, बांग्लादेश नेपाळही भारताच्या पुढे

देशांमधील ग्लोबल हंगर इंडेक्स २०२२ मध्ये भारत १०१ वरून १०७ व्या क्रमांकावर घसरला आहे. १२१ देशांमधील भारताचा १०७ वा क्रमांक आहे. आता शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांनीही या निर्देशांकात भारताला मागे टाकले आहे. भूक आणि कुपोषणाचा आढावा घेणाऱ्या ग्लोबल हंगर इंडेक्सच्या (global hunger index) वेबसाइटने शनिवारी हा अहवाल दिला. यावरुन उपासमारीच्या बाबतीत भारत चिंताजनक परिस्थितीत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर चीन, तुर्की आणि कुवेतसह १७ देशांनी ५ पेक्षा कमी GHI स्कोअर मिळवले आहेत.

हेही वाचा : 

Nirmala Sitharaman : रुपया कमजोर नाही, डॉलर मजबूत होत आहे : निर्मला सीतारामन यांचे विधान

यंदाच्या जागतिक उपासमार निर्देशांकमध्ये भारताला २९.१ गुण देण्यात आले आहेत. यामध्ये भारताला गंभीर देशांच्या यादीत स्थान मिळालं आहे. तसेच या यादीत भारताची सहा स्थानांनी घसरण असून भारताचे शेजारी श्रीलंका (६४), म्यानमार (७१), नेपाळ (८१), बांग्लादेश (८४) आणि पाकिस्तान (९९) हे देश भारताच्या पुढे आहेत. दक्षिण आशियाचा विचार करता भारताच्या मागे फक्त अफगाणिस्तान (१०९) आहे.

जागतिक उपासमार निर्देशांकातील भारताच्या कामगिरीवरुन विरोधी पक्षांनी केंद्रातल्या सरकारवर चांगलीच टीका केली आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी ट्विट करत अच्छे दिन असं म्हटले आहे.

BJP Diwali : दहीहंडी, नवरात्रीनंतर वरळीत भाजपाची हवा, यंदाची दिवाळी जोरात विजेत्यांना देणार लाखोंची बक्षीसं

भारतापेक्षाही वाईट परिस्थितीत आहेत हे देश

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारतापेक्षा वाईट परिस्थितीत काही देश आहे. या देशांमध्ये अफगाणिस्तान, झांबिया आणि आफ्रिकन देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये तिमोर-लेस्टे, गिनी-बिसाऊ, सिएरा लिओन, लेसोथो, लायबेरिया, नायजर, हैती, चाड, डेम, मादागास्कर, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, येमेन या देशांचा समावेश आहे. GHI अहवालात म्हटले आहे की गिनी, मोजाम्बिक, युगांडा, झिम्बाब्वे, बुरुंडी, सोमालिया, दक्षिण सुदान आणि सीरियासह १५ देशांसाठी श्रेणी निश्चित केली जाऊ शकत नाही.

या निर्देशकाचे मापदंड काय?

तीन मापदंडांच्या आधारे जागतिक उपासमार निर्देशांक जाहीर केला जातो.

१) कुपोषण
२) उंचीच्या तुलनेत वजन आणि वजनाच्या तुलनेत उंची
३) बालमृत्यूदर

जागतिक उपासमार निर्देशांकामध्ये शून्य ते ९ गुण असतील तर त्या देशामध्ये उपासमारीची समस्या ही कमी असते. तर १० ते १९.९ गुण असतील तर त्या देशातील उपासमार ही मध्यम अशी असते. २० ते ३४.९ गुण असतील तर त्या देशात उपासमारीचे संकट गंभीर असल्याचं मानलं जातं. ३५ ते ४९. ९ दरम्यान गुण असतील तर चिंताजनक आणि ५० च्या वरती गुण असतील तर अतिशय चिंताजनक स्थिती असल्याचं समजलं जातं.

Raj Thackeray : ‘भाजपने निवडणूक लढवू नये’ अंधेरी पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

Exit mobile version