अरुणाचलच्या तवांगमध्ये भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले, एक अधिकाऱ्याचा मृत्यू

या अपघातात पायलट कर्नल सौरभ यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून संघातील इतर सदस्यांवर सध्या उपचार सुरू आहेत.

अरुणाचलच्या तवांगमध्ये भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले, एक अधिकाऱ्याचा मृत्यू

देशभरात विजयादशमीची तयारी सुरू असतानाच एक वाईट बातमी आता समोर येत आहे. अरुणाचल प्रदेशमधील तवांग जवळ भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर ‘चित्ता’चा अपघात झाला आहे. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन्ही पायलट गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात पायलट कर्नल सौरभ यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून संघातील इतर सदस्यांवर सध्या उपचार सुरू आहेत.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान्येकडील राज्यात झालेल्या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.

‘चित्ता’ हेलिकॉप्टर भारतीय लष्कराच्या ताफ्यात १९७६ मध्ये दाखल झाले होते. हे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर प्रवास, निरीक्षण, पाळत ठेवणे, लॉजिस्टिक, मदत आणि बचाव कार्यासाठी होतो. उंचावरील मोहिमेसाठी हे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर उपयोगी आहे.

हेलिकॉप्टर अपघातातच बिपिन रावत यांनी गमावला होता आपला जीव

डिसेंबर २०२१ मध्ये तत्कालीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचाही हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता.त्यावेळी ते भारतीय वायुसेनेच्या सुलूर स्थानकावरून सर्व्हिस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन, कुन्नूर येथे जात होते.प्रवासादरम्यान त्यांचे Mi-17V5 हेलिकॉप्टर कोसळले.या घटनेत त्यांची पत्नी आणि इतर ९ जणांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा:

दसरा मेळाव्याआधीच रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट म्हणाले, बाळासाहेबांच्या निधनानंतर…

सबा आझादने सोशल मीडियावर शेअर केली तिच्या नव्या चित्रपटाची झलक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version