spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतीय लष्कराचे ‘स्पेशलिस्ट युनिट’ तयार

पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देशांचे भारताला डिवचण्याचे प्रयत्न सतत होत असतात. त्यातच भारतावर सातत्याने होणाऱ्या सायबर हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देशांचे भारताला डिवचण्याचे प्रयत्न सतत होत असतात. त्यातच भारतावर सातत्याने होणाऱ्या सायबर हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. परंतु पाकिस्तान आणि चीनच्या यांच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि सतत होणाऱ्या सायबर हल्ल्याना हल्ल्यांना थांबण्यासाठी भारताचे ‘स्पेशलिस्ट युनिट’ (New Specialist Unit) आता तयार करण्यात आले आहे. भारतीय सैन्याच्या सायबर वेलफेअर इनिशिएटिव्ह (Cyber Welfare Initiatives) अंतर्गत या स्पेशलिस्ट युनिटची स्थापना करण्यात आली आहे.

सरकारी सुरक्षा यंत्राणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याचे प्रमुख मनोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्यामधील तिसऱ्या आठवड्यात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. या युनिटमध्ये आधुनिक नेटवर्कची सुरक्षा आणि त्याच्या तयारीच्या स्तराला वाढवण्यासाठी भारतीय सैन्यात ‘सायबर ऑपरेशन्स आणि सपोर्ट विंग्स’ची (CCOW) येणार आहे. भारताची सायबर सुरक्षेची यंत्रणा आणखी मजबूत होणार आहे. युद्धांमध्ये हे सायबर स्पेस डोमेन सैन्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नवीन सायबर युनिटची स्थापना ही भारतीय लष्करासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. त्याचबरोबर युनिट भारतीय सैन्यासाठी आवश्यक असलेल्या सायबर सुरक्षेच्या कामांसाठी देखील मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून सैन्याची क्षमता वाढवण्यासाठी तसेच उत्तम तत्त्वज्ञान विकसित करण्यासाठी देखील या युनिटची मदत होणार आहे. भारतीय सैन्याच्या बैठकीमध्ये सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतीय लष्कराच्या सज्जतेचे आणि तत्परतेचे मुल्यांकन करण्यात आले. तसेच या परिषदेमध्ये लष्कराचे भविष्य घडवणारे महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss