spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ब्रिटनला मागे टाकत, भारतीय अर्थव्यवस्था आता पाचव्या स्थानावर

जगभरात पुन्हा एकदा भारताने त्याचे नाव मोठे केले आहे . भारताने जागतिक स्तरावर आपली आर्थिक ताकद दाखवून दिली आहे.

जगभरात पुन्हा एकदा भारताने त्याचे नाव मोठे केले आहे . भारताने जागतिक स्तरावर आपली आर्थिक ताकद दाखवून दिली आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताने ब्रिटनला मागे टाकले आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनीनंतर भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे.

ब्रिटनला मागे टाकत भारत पाचव्या क्रमांकावरील जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताच्या मागे पडणे हा ब्रिटनसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ब्रिटन सध्या अनेक संकटातून जात आहे, ज्यात महागाई, कमी वाढ आणि राजकीय अस्थिरता यांचा समावेश आहे. त्याच वेळी, भारत दीर्घ काळापासून जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. एका दशकाआधी या क्रमवारीत भारताचा क्रमांक अकरावा होता. मात्र आता भारत या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कधी काळी ब्रिटिशांचं राज्य असणारा भारत आता ब्रिटनला मागे टाकत अग्रेसर ठरला आहे. भारत आता अमेरिका (America), चीन (China), जपान (Japan) आणि जर्मनी (Germany) या देशांनंतर जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे.

भारताने २०२१ वर्षी शेवटच्या तिमाहीमध्ये ब्रिटनच्या पुढे जात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जीडीपीच्या नव्या आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत भारताने आर्थिक महसूल वाढवला आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत ब्रिटनच्या पुढे असेल असा अंदाज आहे. त्याचबरोबर यंदा भारतीय अर्थव्यवस्थेत सात टक्क्यांहून अधिक वाढ अपेक्षित आहे. भारताची अर्थव्यवस्था या वर्षी ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये (IMI) भारत तिमाहीत दुसऱ्या स्थानावर होता. पण चीनच्या मागे होता. एकेकाळी ब्रिटनने भारतावर राज्य केले आहे. १९४७ पर्यंत ब्रिटनने भारतावर अधिराज्य गाजवलं. मात्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकेडवारीनुसार, भारताने आता ब्रिटनला मागे टाकलं आहे.

तिमाहीत भारतीय शेअर्समध्ये जागतिक गुंतवणुकीमुळे देशाने एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये चीननंतर दुसरे स्थान मिळवलं आहे. तिमाहीच्या शेवटी डॉलरच्या विनिमय दराचा वापर करून, रोखीच्या बाबतीत मार्चमधील तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ८५४. ७ डॉलर बिलियन होता, तर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा आकार ८१६ डॉलर इतका होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF) माहिती आणि ब्लूमबर्ग टर्मिनलवरील संगणक सॉफ्टवेअर वापरून ऐतिहासिक विनिमय दरांचा वापर करून ही आकडेवारी काढली जाते.

दरम्यान, या यादीत ब्रिटनची अर्थव्यवस्था आणखी घसरू शकते, असं तज्ज्ञांचे मत आहे. दुसऱ्या तिमाहीत ब्रिटनचा जीडीपी केवळ एक टक्क्यांनी वाढला आणि चलनवाढीनंतर ०. १ टक्के कमी झाला. येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था आणखी बळकट होईल. जागतिक पातळीवर भारताच्या योगदानातही भर पडत आहे. तसेच विदेशी कंपन्याचे भारतीय कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे, ही भारतासाठी चांगली बाब आहे.

हे ही वाचा:

ठाकरेंना शिंदेंचा पुन्हा एक नवा धक्का!

आज नासाकडून होणार नवीन चंद्रयान लाँच

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss