Sunday, September 29, 2024

Latest Posts

भारतीय फॅक्ट चेकर मोहम्मद जुबेर आणि प्रतीक सिन्हा नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत

सिन्हा आणि झुबेर पद्धतशीरपणे सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा आणि खोट्या बातम्यांना आळा घालत आहेत.

जगातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा नोबेल शांतता पुरस्कार शुक्रवारी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे जाहीर होणार आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार, भारतातील तथ्य-तपासणी करणार्‍या वेबसाईट ऑल्ट न्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर ही या वर्षातील प्रमुख नावे आहेत. नोबेल शांतता पुरस्कार विजेत्याची निवड नॉर्वेजियन नोबेल समितीच्या पाच सदस्यांद्वारे केली जाईल. या पाचही सदस्यांची नियुक्ती नॉर्वेच्या संसदेने केली आहे.

अमेरिकन मासिक टाईमने प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांच्याबद्दल लिहिले आहे, ‘पत्रकार प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर हे तथ्य तपासणाऱ्या वेबसाइट ऑल्ट न्यूजचे संस्थापक आहेत. हे दोघेही भारतातील बनावट माहिती उघड करण्यासाठी धडपडत आहेत. सिन्हा आणि झुबेर पद्धतशीरपणे सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा आणि खोट्या बातम्यांना आळा घालत आहेत. झुबेरला जूनमध्ये वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना कोर्टातून जामीन मिळाला.

भारतीय फॅक्ट चेकर प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर यांच्यासह, टाइमच्या पसंतीच्या यादीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, संयुक्त राष्ट्र निर्वासितांसाठी उच्चायुक्त (UNHCR), बेलारूसी विरोधी राजकारणी स्वयतलाना सिचानोव्स्काया, जागतिक आरोग्य संघटना, रशियाचे विरोधी पक्षनेते आणि भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते अलेक्सी, स्वीडिश हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग, तुवालूचे परराष्ट्र मंत्री सायमन कोफे, इंग्रजी प्रसारक, जीवशास्त्रज्ञ, नैसर्गिक इतिहासकार आणि लेखक सर डेव्हिड अॅटनबरो आणि म्यानमार राष्ट्रीय एकता सरकार यांचा समावेश आहे.

‘हे’ भारतीय ठरले नोबेल शांतता पुरस्काराचे मानकरी

नोबेल शांतता पुरस्काराची स्थापना स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांनी १८९५ मध्ये केली होती. आल्फ्रेड नोबेलने डायनामाइटचा शोध लावला. नोबेल शांतता पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. हा पुरस्कार ‘मानवतेसाठी सर्वात फायदेशीर कार्य’ करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग याही या पुरस्काराच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहेत. भारतातील नोबेल शांतता पुरस्कार विजेत्यांमध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटीजच्या मदर तेरेसा आणि कैलाश सत्यार्थी यांचा समावेश आहे

हे ही वाचा:

खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी हे देशासाठी कलंक आहेत- संभाजी भिडे

‘मी थकणार नाही मी झुकणार नाही… ‘, मेळाव्यात पंकजा मुंडेंची तोफ कडाडली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss