spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Indian Navy भारताच्या लष्करी इतिहासातील हे एक ऐतिहासिक पाऊल, पहिल्यांदाच महिलांना कमांडो होण्याची संधी

भारतीय नौदलाने आता आपल्या विशेष दलांमध्ये महिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या बातमीशी परिचित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नौदलाच्या तीनही ठिकाणी महिलांना प्रथमच कमांडो म्हणून काम करण्याची परवानगी मिळणार आहे. संरक्षण सेवा म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाईल लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलातील जवानांना कठोर प्रशिक्षण दिले जाते, जे कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी घटनेवर तत्काळ कारवाई करण्यास सक्षम असतात.

हेही वाचा : 

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी, पोलीस कोठडीत असलेल्या पत्रकाराची सुटका

(Indian Navy) लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये असणाऱ्या कमांडोंना (Commando) कठोर प्रशिक्षण दिलं जाते. या कमांडोंवर विशेष आणि गुप्त ऑपरेशन्स करण्याची जबाबदारी असते. या कामामध्ये स्पेशल फोर्स कमांडो निपूण असतात. या कमांडोसाठी आतापर्यंत फक्त पुरुषांना परवानगी होती. पण आता भारतीय नौदल महिलांनाही कमांडो होण्याची संधी देणार आहे. हे कमांडो शत्रूच्या युद्धनौका, ऑफशोअर इन्स्टॉलेशन्स आणि इतर महत्त्वाच्या मालमत्तेवर गुप्त हल्ले करू शकतात, विशेष डायव्हिंग ऑपरेशन्स आणि नौदलाच्या ऑपरेशनला समर्थन देण्यासाठी पाळत ठेवणे आणि टोपण मोहिमा. ते सागरी वातावरणातही दहशतवाद्यांशी लढू शकतात आणि काश्मीरमधील वुलर लेक परिसरात दहशतवादविरोधी भूमिकेत त्यांना तैनात करण्यात आले आहे.

शिंदे विरुद्ध ठाकरे, केंद्रीय निवडणूक आयोगात आजपासून खरी लढाई सुरू, संपूर्ण राज्याचे लक्ष

समोर आलेल्या माहितीनुसार, आता प्रशिक्षणानंतर महिलांनी निकष पूर्ण केल्यास त्यांना नौदलात मरीन कमांडो म्हणजे मार्कोस होण्याची संधी मिळेल. भारताच्या लष्करी इतिहासातील हे एक ऐतिहासिक पाऊल असेल. परंतु कोणालाही थेट विशेष दलात सामील केले जाणार नाही. महिला कमांडोंना स्वयंसेवक म्हणून काम करावं लागेल. अधिकाऱ्याच्या हवाल्याने सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षीच्या अग्निवीर भरतीमध्ये भारतीय नौदलात सामील होणाऱ्या महिला अधिकारी आणि नाविक यांना मार्कोस प्रशिक्षणासाठी परवानगी देण्यात येईल.

BEST Premium Bus बीकेसी ते ठाणे ‘बेस्टची प्रीमियम बस’सेवा सोमवारपासून होणार सुरू

Latest Posts

Don't Miss