spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसीय अमेरिका दौरा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान, नरेंद्र मोदी यांनी आज व्हाईट हाऊसवर म्हणजेच अमेरिकेच्या अध्यक्षांचं निवासस्थानि पोहोचले यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन स्वतः मोदींच्या स्वागतासाठी हजर होत्या.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान, नरेंद्र मोदी यांनी आज व्हाईट हाऊसवर म्हणजेच अमेरिकेच्या अध्यक्षांचं निवासस्थानि पोहोचले यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन स्वतः मोदींच्या स्वागतासाठी हजर होत्या. मोदींना त्यांनी स्नेहभोजनासाठी आमंत्रित करून व्हाईट हाऊसमध्ये मोदीसह यांचं बायडेन दाम्पत्याने फोटोसेशनही केले. आणि त्याचवेळेस नरेंद्र मोदी यांनी एक भेटवस्तू देऊन ट्विट देखील केले.

नरेंद्र मोदी यांनी आज व्हाईट हाऊसवर म्हणजेच अमेरिकेच्या अध्यक्षांचं निवासस्थानि पोहोचले यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांनी स्वागत केले. या भेटीवेळी आम्ही अनेक विषयांवर बातचीत केली.असे देखील नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, व्हाईट हाऊस भेटीवेळी मोदी बायडेन दाम्पत्यासाठी काही भेटवस्तू घेऊन गेले होते. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा हिरा भेट म्हणून दिला आहे. हा एक ग्रीन डायमंड आहे. तर मोदींनी अध्यक्ष जो बायडेन यांना ‘दृष्टिसहस्त्रचंद्रो’ ही १० वेगवेगळ्या गोष्टी असलेली चंदनाची पेटी भेट म्हणून दिली आहे. या पेटीत बायडेन यांच्यासाठी एकूण १० भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

या दहा भेटवस्तू मध्ये म्हैसूरमधल्या चंदनापासून बनवलेली लाकडी पेटी जी जयपूरमधल्या तज्ज्ञ शिल्पकाराने बनवली आहे. यामध्ये श्री गणेशाची सुबक अशी चांदीची मूर्ती आणि एक पणती आहे. तसेच यात १० भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये पंजाबमधलं तूप, राजस्थानमधलं २४ कॅरेट हॉलमार्क केलेलं सोन्याचं नाणं, ९९.४ कॅरेट चांदीचं नाणं, महाराष्ट्राचा गूळ, उत्तराखंडचा तांदूळ, तामिळनाडूतले तीळ, भूदानाचं प्रतीक म्हणून (भूमीचं दान)कर्नाटकातल्या चंदनाचा तुकडा, गोदानाचं (गायीचं दान) प्रतीक म्हणून पश्चिम बंगालमधल्या कारागिरांनी घडवलेला चांदीचा नारळ, झारखंडमधलं हाताने विणलेलं रेशमी कापड, गुजरातमधलं मीठ देण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींची US भेट

टुरिंग टॉकिज मध्ये ‘रावरंभा’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss