spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत – नरेंद्र मोदी

आजचा दिवस हा भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण ज्या नौकेला तयार होण्यास तब्बल १३ वर्षे लागली, अशी INS विक्रांत आज भारतीय नौदलात सामिल झाली आहे.

आजचा दिवस हा भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण ज्या नौकेला तयार होण्यास तब्बल १३ वर्षे लागली, अशी INS विक्रांत आज भारतीय नौदलात सामिल झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथून भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका नौदलात सामील केली. यावेळी पंतप्रधानांनी नवीन नौदल चिन्हाचे ही अनावरण केले आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या युद्धनौकेची रचना स्वदेशी आहे. भारतीय नौदलाच्या स्वतःच्या संस्थेच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने युद्धनौका डिझाइन केली आहे. तर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील शिपयार्ड कंपनीनं ही युद्धनौका तयार केली आहे.

 भारतीय नौदलाच्या झेंड्यावरून आता ब्रिटीश राज हटवलं आहे. याचं कारण म्हणजे याआधीच्या भारतीय नौदलाच्या ध्वजावर सेंट जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. हे हटवून आता झेंड्यावर नांगर असणारं भारतीय नौदलाचं चिन्ह आहे. त्यावर सत्यमेव जयते आणि नो वरुण: हे ब्रीद लिहिलेलं आहे. याचा अर्थ ‘जलदेवता वरुण आम्हांला आशीर्वाद देवो’ असा आहे. अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण करताना दिली आहे. तसेच हा नौदलाचा नवा ध्वज जवानांना नवी उर्जा देईल. आजपासून नौदलाचा नवा ध्वज फडकत राहिल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे. त्याच बरोबर शिवाजी महाराज यांनी आरमार दलाचं महत्त्व जाणलं, त्यांनी नौदलाचा विकास केला. असही मोदी म्हणाले. आत्मनिर्भर बनण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. भारतानं गुलामीची एक निशाणी आज उतरवली.

 पुढे मोदी म्हणाले, देशांच स्वप्न पूर्ण होत आहे. आज देशाच्या नव्या भविष्याचे उदय होत आहे. या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. विक्रात अमृत महोत्सवातील अतुलनिय अमृत आहे. आत्मनिर्भर भारताचं प्रतिबिंब म्हणजे विक्रांत. भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत. कितीही मोठं आव्हान असो भारतासाठी काहीही अशक्य नाही. सर्व वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन.आज इतिहास बदलणार आणखी एक काम झालं. भारतानं गुलामीची एक निशाणी आज उतरवली. भारताने नौदलाला महत्त्व दिलं आहे. तसेच मोदींनी महिलांना संबोधित देखील संबोधित केले आहे. युद्धभूमीवर महिलांना सामील केलं जात आहे. महिलांना आता नवी जबाबदारी देण्यात येत आहे. येत्या काळात नौदल अधिक सक्षम होईल. तीनही दलात आता महिलांचा समावेश होईल असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

 तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती पोस्ट केली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, “संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या प्रयत्नांसाठी २ सप्टेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. पहिले स्वदेशी बनावटीची आणि तयार केलेली विमानवाहू जहाज INS विक्रांत कार्यान्वित होणार आहे. नवीन नौदल चिन्हाचेही अनावरण केले जाईल.”

हे ही वाचा:

भारतीय नौदलालाचा नवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

पहिली स्वदेशी युद्धनौका भारतीय नौदलात सामील

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss