spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला होणार, काय आहे अंडरवॉटर मेट्रोची खासियत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते भारतामधील अनेक विकास कामांचे उद्घाटन झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते भारतामधील अनेक विकास कामांचे उद्घाटन झाले आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्चला कोलकाता येथील देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे (Underwater Metro) म्हणजेच पाण्याखालील मेट्रो बोगद्याचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. नवीन तयार करण्यात आलेली ही मेट्रो हावडा मैदान ते एस्प्लेनेड पर्यंत धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोट्यवधी रुपयांचे कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो सेक्शन, कवी सुभाष स्टेशन-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेक्शन आणि तरातला-माजेरहाट मेट्रो सेक्शन याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. पाण्याखालील मेट्रो बोगदा हुगळी नदीच्या पातळीपासून ३२ मीटर खाली तयार करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांचा ये जा करण्याचा वेळ वाचणार आहे. सेक्टर V ते हावडा ही नवीन मेट्रो धावणार आहे. हुगळी नदीच्या खालून धावणारी देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो नदी आणि हावडा यांना कोलकाता शहराशी जोडणार आहे. कोलकातामधील लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही भेट दिली आहे. या उद्घाटनाने अनेक दिवसांचे स्वप्न साकार होणार आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, अंडरवॉटर कोलकाता मेट्रोचे काम १९७० पासून सुरु करण्यात आले होते. पण मोदी सरकारच्या काळात गेल्या १० वर्षांमध्ये झालेली प्रगती मागील ४० वर्षांपेक्षा खूपच जास्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आणि देशाचा पाया रचण्यावर आहे. २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र असणार आहे. आता कोलकाता मेट्रोचे काम पुढील टप्प्यात गेले आहे. शहरातील पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरसाठी नदीखाली बोगदा बांधण्यात आला आहे.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर, संभाजी नगरमध्ये जाहीर सभा

मुलाच्या प्री वेडिंग सोहळ्यात नीता अंबानी यांनी केले पारंपारीक भारतीय नृत्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss