भारताच्या विदेशी कर्जात मोठी वाढ

भारताच्या विदेशी कर्जात मोठी वाढ

भारतावर दिवसेंदिवस परदेशी कर्ज वाढतच चालले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्याच्या मध्ये मोठ्या प्रमणावर वाढ झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितलेल्या आकडेवारीनुसार, जून २०२३ मध्ये भारताच्या कर्जात ६२९ अब्ज डॉलर होते. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कर्जात २.७ टक्क्यांनी अधिक वाढ झाली आहे. एनआरआय ठेवींमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

झर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, जून तिमाहीत अशा ठेवी ६.५ टक्क्यांनी वाढून $१६७ अब्ज झाल्या आहेत. एक वर्षापूर्वी, जून २०२२ च्या तिमाहीच्या समाप्तीनंतर, हा आकडा $१५७ अब्ज होता. तर बिगर-वित्तीय कॉर्पोरेशन्सच्या ठेवी $२५० बिलियनवर स्थिर राहिला आहे. सर्वसाधारण सरकारी कर्ज कमी झाले आहे, तर गैर-सरकारी कर्ज वाढले आहे, असेही या आकडेवारीवरून दिसून आले आहे. भारताच्या परकीय कर्जामध्ये मोठी वाढ झाली आहे. भारताच्या एकूण विदेशी कर्जामध्ये अमेरिकन डॉलर कर्जाचा मोठा वाटा आहे. तर जून २०२३ मध्ये तिमाहीच्या नंतर हा हिस्सा ५४.४ टक्के होता. तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय रुपयातील कर्ज आहे. सध्या हे कर्ज ३०.४ टक्के एवढे आहे.दक्षिण आफ्रिकन रँड ५.७ टक्के योगदानासह तिसऱ्या स्थानावर, जपानी येन ५.७टक्के योगदानासह चौथ्या स्थानावर आणि युरो ३ टक्के योगदानासह पाचव्या स्थानावर आहे.तसेच गैर सरकारी कर्जामध्ये वाढ झाली आहे.

जून मध्ये बाह्य कर्ज आणि जीडीपीचे प्रमाण कमी झाले आहे. मार्च २०२३ तिमाही संपल्यानंतर १८.८ टक्के होते, जे जून तिमाहीच्या अखेरीस १८.६टक्क्यांपर्यंत खाली आले. या कालावधीत कर्ज सेवेत म्हणजेच कर्ज भरणामध्ये चांगली वाढ झाली आहे. मार्च २०२३ अखेर ५. ३ टक्के होता, जो जून २०२३ अखेर ६.८ टक्के झाले आहे. देशाच्या बाह्य आणि सरकारी कर्जामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version