मार्च महिन्याच्या सुरवातीलाच महागाईचा तडाखा!, LPG सिलेंडर मध्ये ५० रुपयांची वाढ

मार्च महिना हा आर्थिक वर्षातला शेवटचा आणि महत्वाचा महिना आहे . सामान्य लोकांसाठी मार्चच्या पहिल्याच दिवशी महिन्याचं बजेट हलवणारी बातमी मिळाली .

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच महागाईचा तडाखा!, LPG सिलेंडर मध्ये ५० रुपयांची वाढ

मार्च महिना हा आर्थिक वर्षातला शेवटचा आणि महत्वाचा महिना आहे . सामान्य लोकांसाठी मार्चच्या पहिल्याच दिवशी महिन्याचं बजेट हलवणारी बातमी मिळाली . आता घरगुती वापरातला सिलेंडर मध्ये ५० रुपयांनी वाढ झाली आहे. ह्या पूर्वी ८ महिन्याआधी LPG सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती मध्ये वाढ होत राहिली परंतु त्याचा परिणाम घरगुती सिलेंडरच्या किंमतीवर झाला नव्हता. आतापर्यंत सिलेंडरची किंमत ही दिल्लीत १०५३ तर मुंबईत १०५२ इतकी होती आणि आता वाढलेल्या महागाईनंतर घरगुती सिलेंडर दिल्लीत ११०३ तर मुंबईत ११०२ इतके झाले आहे. त्यासोबतच व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती मध्ये देखील ३५० रुपयांची वाढ झाली आहे .

सिलेंडरच्या किंमतीत वाढ कशामुळे होते –

भारतात जेव्हढा LPG गॅस उपलब्ध आहे त्यातील बराचसा गॅस हा आयात केला जातो . जगातल्या LPG गॅस ची किंमत हि IPP म्हणजेच इम्पोर्ट पॅरिटी प्राइसवर अवलंबून असते . IPP देखील आंतराष्ट्रीय बाजारातील किमतीवर ठरते. भारतातील गॅस च्या किमती ह्या सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या LPG गॅस च्या किमतीवर निश्चित होतात. मागील ८ महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती मध्ये वाढ होत राहीली पण घरगुती गॅस ची किंमत हि तितकीच होती. LPG गॅस च्या किंमतीत कस्टम ड्युटी ,वाहतूक खर्च, विमा ह्याचा देखील समावेश होतो . त्याशिवाय डॉलरच्या प्रमाणात रुपयांची होणारी घसरण देखील गॅसच्या किमतीवर परिणाम करते .

दरवाढीनंतर LPG गॅसच्या किमतीमध्ये झालेले बदल –

दिल्ली – आधी १०५३ आता ११०३
मुंबई – आधी १०५२ आता ११०२
कोलकत्ता – १०७९ आता ११२९
चेन्नई – १०६८ आता १११८

व्यावसायिक सिलेंडर मधील वाढ –

दिल्ली -आधी १७६९ आता २११९
मुंबई-आधी १७२१ आता २०७१
कोलकत्ता -आधी ११७० आता २०७१
चेन्नई -आधी १९१७ आता २२६८

हे ही वाचा :

The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, नव्या राज्यपालांनी केले अभिवादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version