ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये महागाई वाढली, ७.४१ टक्क्यांवर पोहोचला किरकोळ महागाई दर

तृणधान्ये आणि भाजीपाला यांसारख्या मूलभूत वस्तूंच्या किंमती ह्या किरकोळ महागाईचे सर्वात मोठे निर्धारक आहेत.

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये महागाई वाढली, ७.४१ टक्क्यांवर पोहोचला किरकोळ महागाई दर

महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या समस्या अलीकडच्या काळात वेगाने वाढत चालल्या आहेत. देशात पुन्हा एकदा किरकोळ महागाई दरात (CPI) वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई दर (CPI) सप्टेंबरमध्ये ७.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्टमध्ये तो ७ टक्के होता.

जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.७१ टक्के होता. अन्नधान्याच्या किंमतीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे महागाई वाढली आहे. भारतातील किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये ७.४१% पर्यंत वाढली, जी एप्रिलपासूनची सर्वोच्च आहे, वाढत्या अन्नाच्या किंमती आणि ऊर्जेच्या उच्च खर्चामुळे ही महागाई वाढत आहे.

नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ग्राहक किंमत निर्देशांक-आधारित महागाई (CPI) सप्टेंबरमध्ये वाढून ७.४१ टक्क्यांवर पोहोचली आहे, जो एका वर्षापूर्वी ऑगस्टमध्ये ७ टक्क्यांवर होती. या दरवाढीनंतर आरबीआयवर वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो दरात वाढ करण्याचा दबाव पुन्हा येणार आहे.

ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) बास्केटच्या निम्मा वाटा असलेली अन्नधान्य महागाई गहू, तांदूळ आणि कडधान्ये यासारख्या अत्यावश्यक धान्यांनी बनलेली आहे. अलीकडच्या काळात या धान्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. या वाढीमुळे ग्राहकांचे बजेट वाढले आहे. तृणधान्ये आणि भाजीपाला यांसारख्या मूलभूत वस्तूंच्या किंमती ह्या किरकोळ महागाईचे सर्वात मोठे निर्धारक आहेत. सतत बदलणाऱ्या पावसाचे स्वरूप आणि रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे पुरवठ्याची चिंता वाढली आहे.

हे ही वाचा:

ओडिशात लवकरच सुरू होणार ‘चक्रीवादळ हंगाम’ राज्यसरकारने दिले सतर्क राहण्याचे निर्देश

Flying Car : ट्रॅफिक जॅमची चिंता संपली! चिनी फ्लायिंग कारचे दुबईतील ९० मिनिटांचे उड्डाण ठरले यशस्वी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version