spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

INS Arihant : INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

भारताने आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Nuclear Capable Ballistic Missile) यशस्वी चाचणी केली आहे. हे भारतासाठी एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल आहे.

भारताने आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Nuclear Capable Ballistic Missile) यशस्वी चाचणी केली आहे. हे भारतासाठी एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल आहे. संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे की, भारताने आण्विक पाणबुडी INS अरिहंतवरून (INS Arihant) बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (Ballistic Missile) यशस्वी चाचणी (India Fires Ballistic Missile) केली आहे.

संरक्षण मंत्रालयाने पुढे म्हटलं आहे की, अनेक देशांकडून बॅलेस्टिक (Ballistic Missile) आणि आण्विक क्षेपणास्त्रांची (Nuclear Missile) चाचणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी योग्य तयारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताचं हे पाऊल फार महत्त्वाचं आहे. भारताने १४ ऑक्टोबर रोजी बॅलेस्टिक मिसाईल टेस्ट (Ballistic Missile Test) केली, जी यशस्वी ठरली. विशेष म्हणजे INS अरिहंतवरून (INS Arihant) चाचणी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राची पहिल्यांदाच संरक्षण मंत्रालयाने अधिकृत माहिती दिली आहे. INS अरिहंत २००९ मध्ये लाँच करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ मध्ये INS अरिहंत नौदलाच्या सेवेत रुजू झाली. मात्र INS अरिहंतच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कोणत्याही चाचणीची माहिती देण्यात आली नव्हती. INS अरिहंतबाबत नौदलाने नेहमीच गोपनियता बाळगली आहे.

INS अरिहंत भारतीय नौदलातील एकमेव न्यूक्लिअर बॅलेस्टिक सबमरीन (SSBN) म्हणजे आण्विक पाणबुडी आहे. INS अरिहंत भारतीय नौदलातील एकमेव आण्विक बॅलेस्टिक पाणबुडी २००९ मध्ये लाँच करण्यात आली. त्यानंतर नौदलाने या पाणबुडीला २०१६ साली कोणताही गाजावाजा न करता नौदलात सामील करुन घेतलं. INS अरिहंत लाँच करण्यात आली तेव्हा या पाणबुडीचा फोटो समोर आला होता. मात्र त्यानंतर याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शुक्रवारी झालेल्या क्षेपणास्त्र चाचणीचे फोटो किंवा व्हिडीओ लवकरच प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आम्ही जिंकूच – चंद्रशेखर बावनकुळे

Andheri East Bypoll 2022 : उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट व भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss