spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Instagram : इंस्टाग्राम यूजर्ससाठी मोठी बातमी; नवं फिचर आले भेटीस

सध्या इंस्टाग्राम सर्वांसाठी खूप जास्त लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या प्रचंड आहे. तरूणाईमध्ये इंस्टाग्रामची प्रचंड क्रेझ आहे.

सध्या इंस्टाग्राम सर्वांसाठी खूप जास्त लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या प्रचंड आहे. तरूणाईमध्ये इंस्टाग्रामची प्रचंड क्रेझ आहे. मेटा (Meta) कंपनीची मालकी असलेलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचं (Instagram) नवं फिचर आणणार आहे. याच यूजर्ससाठी इंस्टाग्राम सतत नवीन फिचर अपडेट करत असते.

Instagram च्या या नवीन फीचरमुळे युजर्सना त्यांच्या प्रोफाइलच्या QR कोडद्वारे प्रोफाइल शेअर करण्याची परवानगी मिळेल. याशिवाय तुम्हाला तुमची पोस्ट, रिल्स किंवा लोकेशन क्यूआर कोडमुळे शेअर करणं सोपं होईल, असं इंस्टाग्रामने म्हटलं आहे. इंस्टाग्रामची मालकी असलेल्या मेटा कंपनीने सांगितले की त्यांनी ‘लोक आणि व्यवसायांना विशिष्ट कंटेट सर्च किंवा अँड करणे सोपे करण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवरील युजर्ससाठी आता QR कोड शेअरिंगचा पर्याय उपलब्ध असेल. यासाठी तुम्हाला फक्त कोणत्याही रील्स, पोस्ट किंवा लोकेशनवरील थ्री-डॉट मेनूवर क्लिक करायचे आहे. यामध्ये वरच्या बाजूला उजवीकडे ‘QR कोड’ ऑप्शनवर क्लिक करा आणि तो तुमच्या कॅमेरा रोलमध्ये सेव्ह करु शकता. तुम्ही QR कोड जनरेट करण्यासाठी ब्राउझरवरील पोस्टच्या URL मध्ये ‘/qr’ लिहून देखी क्यूआर कोड जनरेट करु शकता.

इंस्टाग्रामने पोस्टसाठी क्यूआर कोड (QR Code) हे नवीन फिचर आणणार आहे. तुम्ही आता पोस्ट, रील्स, टॅग आणि लोकेशनसाठी QR Code बनवू शकता. यामुळे इंस्टाग्राम युजर्स आता QR कोडद्वारे त्यांची पोस्ट, रील्स, टॅग आणि लोकेशन्स शेअर करु शकतील.

हे ही वाचा:

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे मोठं व्यक्तव्य म्हणाला, हार्दिक पांड्यासारखा खेळाडू…

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या मोदीं विरोधात वक्तव्यानंतर, चक्क राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली पाठराखण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss