International Daughters Day 2024: कन्या दिनानिमित्त राजकीय नेत्यांनी सोशल मिडीयावर केल्या भावना व्यक्त

आंतरराष्ट्रीय कन्या दिनाचं औचित्य साधत पालक आपल्या मुलींसोबतचं खास नातं सोशल मीडियावर शेअर करत आहेत. याच निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत.

International Daughters Day 2024: कन्या दिनानिमित्त राजकीय नेत्यांनी सोशल मिडीयावर केल्या भावना व्यक्त

दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी आंतरराष्ट्रीय कन्या दिवस (International Daughters Day) साजरा केला जातो. यंदा हा दिवस २२ सप्टेंबर रोजी आला आहे. हा दिवस केवळ मुलींचे महत्त्व समजावून सांगण्यासाठीच नव्हे तर समाजात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. पितृप्रधान संस्कृती असलेल्या भारत देशामध्ये मुलाला वंशाचा दिवा म्हणून पाहिलं जात होतं, पण आता स्थिती बदलली आहे. मुलीदेखील मुलांच्या वरचढ सक्षमपणे सर्व क्षेत्रात आपलं स्थान उज्ज्वल करत आहेत. आंतरराष्ट्रीय कन्या दिनाचं औचित्य साधत पालक आपल्या मुलींसोबतचं खास नातं सोशल मीडियावर शेअर करत आहेत. याच निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे. तसेच राजकारण क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या कन्येसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

या आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त मुलींच्या आयुष्यातील आनंद आणि प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती साजरी करूया. त्यांना नेहमी नवीन उंची गाठण्यासाठी सक्षम करूया. माझ्या प्रिय दिविजाला कन्या दिनाच्या शुभेच्छा! माझा अभिमान, आनंद आणि शक्ती, स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे, भविष्याला तुझ्या नवा आकार मिळू दे… आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा ! अशी पोस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर  कन्या दिनाच्या निमित्ताने “हा माझा आणि माझ्या मुलीचा एक जुना फोटो आहे. हा फोटो जेव्हा जेव्हा पाहतो ना तेव्हा मन रमतं जुन्या आठवणींत… वाटतं ज्यांच्या घरी मुली आहेत ते नेहमी आनंदी असतात ,त्यांचं घर हसतं खेळतं असते …नेहमी प्रसन्न असते आणि हे घर आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे. म्हणतात ना बेटी नहीं ये धन की पेटी है”, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या निमित्ताने भावना व्यक्त केल्या आहेत.

कन्या दिनी राज्यसभेचे सदस्य अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत असं म्हटलं की, “मुलगी हे आईचं दुसरं रुप असते. आईच्या पश्चात आयुष्यभर ती आपल्यावर आईसारखी माया करते. मी नेहमी देवाचा आभारी राहिलो आहे की त्याने मला दोन-दोन मुलींचं वरदान दिलं. मुली आपल्या आयुष्यात रंग भरतात. मुली आयुष्यभर आपली काळजी घेतात. आई ही ईश्वराने घडवलेली सर्वात अद्भूत रचना आहे, आणि त्यानंतर देवाची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे मुलगी… कन्या दिनाच्या निमित्ताने सुजया व श्रीजयासह जगाच्या पाठीवरील सर्व मुलींना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद. तसेच महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी कन्या दिनाचे औचित्य साधत अशी पोस्ट केली की, ज्यांच्या असण्याने चैतन्य असते, ज्यांच्या हसण्याने आयुष्य फुलते..आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! या पोस्ट सोबत त्यांनी त्यांच्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

महायुतीत आल्यास Prakash Ambedkar यांना मंत्रिपद देऊ, Ramdas Athawale यांची ‘वंचित’ ला मोठी ऑफर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version