International Day of Sign Languages 2024: आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस का साजरा केला जातो माहिती आहे का तुम्हांला ?

International Day of Sign Languages 2024: आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस का साजरा केला जातो माहिती आहे का तुम्हांला ?

International Day of Sign Languages 2024: दरवर्षी २३ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ज्या लोकांना बोलता येऊ शकत नाही किंवा जे ऐकू येऊ शकत नाही अश्या लोकांसाठी सांकेतिक भाषा फार महत्वाची आहे. सांकेतिक भाषा दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा लोकांना सांकेतिक भाषेचे महत्व आणि सौंदर्य पटवून देणे हा आहे. मूकबधिर लोकांसाठी सांकेतिक भाषा फार महत्वाची आहे. यामध्ये संभाषण, संवाद हा हाताने, इशाऱ्यांच्या मदतीने किंवा विविध हावभावातून केला जातो.

२०१८ साली पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस साजरा केला गेला. २३ सप्टेंबर २०१८ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने प्रथमच आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा करण्याची घोषणा केली. लोकांना सांकेतिक भाषेच्या महत्वाची जाणून व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सांकेतिक दिवस कर्णबधिरांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा आपण शरीराच्या अवयवांच्या माध्यमातून संवाद साधत असतो तेव्हा ती सांकेतिक भाषा असते. एखाद्याला ऐकता येत नसेल किंवा बोलता येत नसेल तर ही भाषा त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. अश्या नागरिकांसाठी सांकेतिक भाषा महत्वाची असते.

या दिवशी विविध ठिकाणी खास कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमाद्वारे कर्णबधिर, दिव्यांग व्यक्तींना नवीन माहिती मिळू शकेल. हे कार्यक्रम दरवर्षी एका खास थीमवर आधारित असतात. प्रत्येक देशाची स्वतःची सांकेतिक भाषा असते. जसे की यूएस मध्ये ती अमेरिकन सांकेतिक भाषा आहे, तर यूकेमध्ये ती ब्रिटिश सांकेतिक भाषा आहे. सांकेतिक भाषा दिव्यांगांसाठी आणि कर्णबधिरांसाठी त्यांची ओळख आणि समाजातील सहभागासाठी एक मूलभूत साधन आहे. त्यामुळे हा दिवस म्हणजे सर्वांसाठी समान समाज आणि संधी सुनिश्चित करण्यासाठीचे समर्थन करतो.

हे ही वाचा:

लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांवरून Sanjay Raut यांचा महायुती सरकारवर निशाणा

Raj Thackeray Vision Worli: Sandeep Deshpande हा राजकीयदृष्ट्या जागृत आणि अभ्यासू मुलगा, तो आमचा हिरा! ठाकरेंकडून देशपांडेंचे कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version