INTERNATIONAL YOGA DAY 2023, योग दिवस साजरा करताना या शुभेच्छांचा करा वापर.

निरोगी आयुष्यासाठी योगासन अतिशय महत्वाचं आहे. योगाचे फायदे खूप आहेत. २१ जून हा दिवस जगभरात "आंतरराष्ट्रीय योग दिवस" म्हणून साजरा केला जातो.

INTERNATIONAL YOGA DAY 2023, योग दिवस साजरा करताना या शुभेच्छांचा करा वापर.

योग आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचे आहे. प्राचीन भारतीय परंपरेची एक अनमोल देणगी, म्हणजे योग. भारतात योगाची मुळे खोलवर शोधून काढली तर, योग हा भारतात ५००० वर्षांहून अधिक काळापासून प्रचलित आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी योग हा सर्वात विश्वासार्ह आणि उत्तम पर्याय आहे. म्हणूनच योगाचे महत्व सर्वांना समजण्यासाठी दरवर्षी भारतासह संपूर्ण जगभरामध्ये आंतराष्ट्रीय योग दिन हा २१ जून रोजी साजरा केला जातो.

निरोगी आयुष्यासाठी योगासन अतिशय महत्वाचं आहे. योगाचे फायदे खूप आहेत. २१ जून हा दिवस जगभरात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो. योगाचे महत्त्व ओळखून जगातील सर्व देश योग दिन साजरा करतात. योगामुळे तुमच्या शरीरातील अनेक व्याधी दूर होतात. अगदी शरीरातील बद्धकोष्ठता (Constipation), साखर(sugar) यांच्यासारखे आजार दूर होतात. मनाला आवश्यक असलेली मनःशांती आणि उत्तम आरोग्य फक्त योगमुळे मिळते. म्हणूनच या योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देताना पुढील शुभेच्छांचा वापर नक्की करा.

निर्धार नियमित योग करण्याचा
आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!

योग निसर्गाजवळ नेतो
योग ईश्वराची अनुभूती देतो
योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!

योग करेल रोज
त्यापासून दूर राहील रोग
आंतरराष्ट्रीय
योग दिनाच्या शुभेच्छा!

योगाशिवाय मनःशांती नाही,
योग असेल तिथे रोग नाही
जागतिक योग दिनाच्या खूप शुभेच्छा!

योग असे जेथे
रोग नसे तेथे
जागतिक योग दिनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा!

हे ही वाचा:

बच्चू कडू शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले…

वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या पवारांचा पक्ष करतोय निष्ठेसाठी आंदोलन! | NCP | Sharad Pawar |

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version