आयफोन युजर्सना मिळणार १० हजार रुपये रिफंड; जाणून घ्या काय आहे पॉलिसी आणि प्रोसेस…

आयफोन युजर्सना मिळणार १० हजार रुपये रिफंड; जाणून घ्या काय आहे पॉलिसी आणि प्रोसेस…

Apple ने नवीन लाँच केलेल्या iPhone 16 सीरिजमध्ये आयफोन १६, आयफोन १६ प्रो, आयफोन १६ प्रो मॅक्स आणि आयफोन १६ प्लस ( iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, and iPhone 16 Pro Max) या चार मॉडेलचा समावेश आहे. हे iPhone आता प्री ऑर्डरसाठी ( Pre Order) उपलब्ध झाले असून या २० सप्टेंबरपासून यांची विक्री सुरु केली जाणार आहे. नवीन फीचर्स आणि अपग्रेडसह आलेल्या या मॉडेलसोबतच कंपनीने जुन्या मॉडेल्सच्या किमतींमध्ये घट करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 14 आणि iPhone 14 Plus या आयफोन मॉडेल्सची किंमत दहा हजार रुपयांनी कपात होणार आहे.

आयफोनने काही ग्राहकांसाठी प्राईज प्रोटेक्शन पॉलिसी (Price Protection Policy) लागू केली आहे. या पॉलिसीमुळे ज्या ग्राहकांनी अलीकडेच iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 14 किंवा iPhone 14 Plus खरेदी केले आहेत त्यांना प्राइस ड्रॉपनंतर रिफंड किंवा स्टोर क्रेडिट दिले जाणार आहेत. यासाठी ग्राहकांनी फोन कपातीच्या घोषणेआधी १४ दिवसांच्या कालावधीत घेतलेला असणे गरजेचे आहे.

१० हजारांचा रिफंड कसा मिळवावा
ग्राहक अ‍ॅप्पल स्टोरवर जाऊन किंवा ०००८०० ०४० १९६६ या नंबरवर अ‍ॅप्पल कस्टमर केयरला कॉल करून रिफंड किंवा क्रेडिटची विनंती करू शकतात. महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे मूळ बिल असणे गरजेचे आहे हा रिफंड त्याच ग्राहकांना मिळेल ज्यांनी १४ दिवसांमध्ये खरेदी केली आहे. मात्र स्पेशल सेल किंवा लिमीटेड टाइम डील मध्ये खरेदी केलेल्या आयफोन्सवर रिफंड मिळणार नाही आहे. अ‍ॅप्पलची प्राइस प्रोटेक्शन पॉलिसी एका व्यक्तीला १० आयफोन्स पर्यंत रिफंड मिळवून देऊ शकते. यामध्ये कंपनी फोन तुमच्याकडेच असल्याचा पुरावा सुध्दा मागू शकते. ज्या ग्राहकांनी अलीकडेच आयफोन १४ आणि आयफोन १५ ची खरेदी केली आहे, त्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये असा या पॉलिसीमागचा उद्देश आहे.

हे ही वाचा:

सरकारच्या एका निर्णयाने शेतकऱ्यांना फायदा होणार का? सणासुदीच्या दिवसात कांदा ग्राहकांना रडवणार का हसवणार?

Eid-e-Milad निमित्त शिंदे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवशी असणार ईदची सुट्टी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version