spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या आयएसच्या बॉम्बरला रशियाने घेतले ताब्यात

भारतात एका मोठ्या राजकीय नेत्यावर हल्ला करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती

रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (FSB) ने सोमवारी सांगितले की त्यांच्या अधिकार्‍यांनी आत्मघाती बॉम्बर, इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाचा सदस्य, जो भारतातील सत्ताधारी पक्ष भाजपमधील मोठ्या नेत्याच्याविरुद्ध हत्येचा कट हा दहशतवादी रचत होता आणि आता त्याला ताब्यात घेतले आहे, असे रशियाची वृत्तसंस्था स्पुतनिकने वृत्त दिले आहे.

“रशियाच्या FSB ने रशियामध्ये बंदी घातलेल्या इस्लामिक स्टेट आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा सदस्य म्हणून या दहशदवाद्याची ओळख पटली आहे. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या चौकशीत हा दहशतवादी आत्मघातकी हल्लेखोर असल्याची माहिती समोर आली आहे. रशियन तपास यंत्रणांना या दहशतवाद्याच्या हालचाली माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक केली. हा दहशतवादी 30 वर्षीय युवक असून तो मध्य आशियाई प्रदेशातील एका देशाचा मूळ रहिवासी असल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली. भारतातील मोठ्या राजकीय नेत्याची हत्या याच वर्षात करण्याचा कट त्याने आखला होता, अशी माहितीदेखील चौकशीतून समोर आली आहे.

रशियन वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युवक टेलिग्रामच्या माध्यमातून या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. या दहशतवाद्याने एप्रिल ते जून दरम्यान तुर्कीत दहशतवादी हल्ल्याचे प्रशिक्षण घेतले असून या तरुणाला इस्लामिक स्टेटच्या मोठ्या नेत्याने दहशतवादी संघटनेत सामिल करून घेतले होते.

रशियन संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात एका मोठ्या राजकीय नेत्यावर हल्ला करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. काही कागदपत्र घेऊन तो युवक रशियतून भारतात जाणार होता आणि राजकीय नेत्याची हत्या करणार होता. पण, तो कोणत्या नेत्यावर हल्ला होणार होता, याची माहिती अद्याप समोर आली नाही.

2013 मध्ये अस्तिवात आलेली इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना क्रूर दहशतवादी संघटना समजली जाते. या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याला मुस्लिमांचा खलिफा घोषित करण्यात आले. इराक आणि सीरियातील मोठ्या भूभागावर या दहशतवादी संघटनेचा ताबा आहे. त्याशिवाय, आफ्रिकेतील काही देशांमध्येही आयएस शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

कपिल शर्मा शो पुन्हा परतणार परंतु हा चेहरा असणार शोमधून गायब

“शिवसेनेशी युतीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील”, बाळा नांदगावकरांचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

 

Latest Posts

Don't Miss