इस्रोचे सर्वात वजनदार रॉकेट नवीन मिशनसह बाजारपेठेत प्रवेश करणार; कसे आहे हे शक्तिशाली रॉकेट?

इस्रोचे सर्वात वजनदार रॉकेट नवीन मिशनसह बाजारपेठेत प्रवेश करणार; कसे आहे हे शक्तिशाली रॉकेट?

देशातील सर्वात शक्तिशाली रॉकेट ‘लाँच व्हेईकल मार्क ३’ (LVM3) २३ ऑक्टोबर रोजी एका ब्रिटिश कंपनीचे ३६ उपग्रह लॉन्च करणार आहे. इस्रोकडून प्रथमच याचे प्रक्षेपण एल.वि.एम-३ द्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून रात्री केले जाईल. या रॉकेटला पूर्वी जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मार्क ३ म्हणजेच जी.एस.एल.वि एम ३ असे म्हटले जात होते.

१. इस्रोच्या सर्वात वजनदार प्रक्षेपकासाठी हे पहिले व्यावसायिक अभियान आहे. तसेच, ५,७९६ किलो चे पेलोड वस्तुमान सर्वात जड असेल.

२ प्रक्षेपणासाठी न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) – ISRO ची व्यावसायिक शाखा – आणि युनायटेड किंगडम-आधारित ‘OneWeb’ – यांच्यातील करार “एक महत्त्वाचा टप्पा” असल्याचे म्हटले जाते. भारतातील भारती एंटरप्रायझेस ही OneWeb मधील एक प्रमुख गुंतवणूकदार आहे, जे अंतराळातून चालणारे जागतिक संप्रेषण नेटवर्क आहे. OneWeb सरकार, समुदाय आणि व्यवसाय यांच्यातील कनेक्टिव्हिटी सक्षम करते.

३. यासह,एल.वि.एम-३ “जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण सेवा बाजारपेठेत प्रवेश करत आहे,” असे स्पेस एजन्सीने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे.

४. ही देखील पहिली बहु-उपग्रह मोहीम आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून छत्तीस उपग्रह “एक-एक करून एल.वि.एम३ कक्षेत प्रस्थापित केले जातील”.

५.एल.वि.एम३ सह NSIL ची ही पहिलीच मोहीम असली तरी, भारतीय रॉकेटमध्ये सहा टन पेलोड असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हे मिशन NSIL आणि ISRO साठी एक ऐतिहासिक ठरणार आहे, कारण एल.वि.एम३ ने जागतिक आणि व्यावसायिक लॉन्च मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. हे ऑन-डिमांड लॉन्च आहे, याचा अर्थ भारत भविष्यात अनेक देश आणि कंपन्यांशी असेच करार करून आर्थिक लाभ घेऊ शकेल. या तीन टप्प्यातील रॉकेटमध्ये पृथ्वीपासून ३७,००० किमी उंचीवर जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये ४,००० किलोपर्यंतचे उपग्रह ठेवण्याची क्षमता आहे.

हे ही वाचा :

Diwali bollywood party 2022 : बॉलिवूड कलाकारांची दिवाळी पार्टी, एकापेक्षा एक स्टायलिश लुकमध्ये अभिनेत्यांनी लावली हजेरी

एटीएसची मोठी कारवाई; नाशिकमधून आजून एका पीएफआय कार्यकर्त्याला अटक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version