spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Jakarta Mosque Fire : इंडोनेशियामध्ये मोठ्या मशिदीला भीषण आग

इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी जकार्तामध्ये (Jakarta) एका मोठ्या मशिदीला भीषण आग (Mosque Caught Fire) लागली आहे. या आगीच्या दुर्घटनेनंतर मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये मोठ्या जामा मशिदीला भीषण आग लागली.

इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी जकार्तामध्ये (Jakarta) एका मोठ्या मशिदीला भीषण आग (Mosque Caught Fire) लागली आहे. या आगीच्या दुर्घटनेनंतर मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये मोठ्या जामा मशिदीला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर मशिदीची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. जकार्ता इस्लामिक सेंटरच्या परिसरातील ही मशीद आहे. मात्र या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 आगीमुळे मशिदीचा घुमट जळून खाक झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता अग्निशामक दलाला आग लागल्याची सूचना देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण आग इतकी भीषण होती की संपूर्ण घुमटात पसरली आणि मशीद कोसळली घुमटाला आग कशी लागली याबाबत कोणतेही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. मशिदीचा घुमटाला आग लागली तेव्हा आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. मात्र, आग वाऱ्यामुळे आग मोठी झाली. आग लागल्या तेव्हा सुरुवातीला परिसरातील लोकांना बाहेर काढण्यात आले.

इंडोनेशियातील जकार्ता येथील इस्लामिक सेंटर मशिदीला बुधवारी भीषण आग लागली. आगीमुळे मशिदीचा घुमट पत्त्यांसारखा कोसळला. ही आग फार भीषण होती. या अपघातात कोणातीही जीवितहानी झालेली नाही. मशिदीच्या घुमटाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असताना ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग इतकी वेगाने पसरली की काही वेळात ही आग मशिदीच्या घुमटात वेगानं पसरली आणि मशिदीचा घुमट जमीनदोस्त झाला.

हे ही वाचा:

Diwali 2022 : मुंबईत परवान्याशिवाय फटाकेविक्रीवर बंदी!

… तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली म्हणतं, शिंदेनी नाव न घेता साधला अप्रत्यक्षपणे निशाणा

MCA Election : दिग्गज राजकारणी एकाच मंचावर ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss