“जनधन, आधार आणि मोबाईलमुळे भारतात ट्रान्सफॉर्मेशनला गती आली आहे”; PM Modi यांचे वक्तव्य

“जनधन, आधार आणि मोबाईलमुळे भारतात ट्रान्सफॉर्मेशनला गती आली आहे”; PM Modi यांचे वक्तव्य

वाढवणं बांदरानिमित्त आज (२० ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण झाले आहे. या मार्गक्रमणाचा पहिला टप्पा हा  सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला ते भेट आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दुपारी दीडच्या सुमारास ते पालघरसाठी रवाना झाले आहेत, पालघर येथील सिडको ग्राऊंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. हे बंदर भारतातील सर्वांत मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असणार आहे. या बंदराच्या कामाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान त्यांनी जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर यथे संबोधन केले आहे. जाणूयात ते काय म्हणाले आहेत.

नक्की काय म्हणाले नरेंद्र मोदी ?

“जनधन, आधार आणि मोबाईलमुळे भारतात ट्रान्सफॉर्मेशनला गती आली आहे. गेल्या १० वर्षांमध्ये जनधन, आधार मोबाईल या त्रिवेणीने स्थित्यंतराच्या प्रक्रियेला गती दिली आहे. पूर्वीच्या काळी ‘कॅश इज किंग’ म्हटले जायचे. पण आजघडीला जगातील अर्ध्याहून अधिक रियल टाईम डिजिटल व्यवहार भारतात होतात. संपूर्ण जगात भारताचा युपीआय हे फिनटेकचे मोठे उदाहरण आहे. आज शहरात किंवा गावात कोणताही ऋतू असतो, भारतातील बँकिग सर्व्हिस २४ तास सुरु असते. कोरोनासारख्या संकटकाळातही भारत हा बँकिग व्यवस्था सुरळीत असणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक होता. जनधन बँक खाती हे महिला सबलीकरणाचे माध्यम झाले आहे. त्यामुळे महिलांना बचत आणि गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध झाला. मुद्रा योजनेच्या माध्यमातून तब्बल २७ ट्रिलियनची कर्जे देण्यात आली, याच्या ७० टक्के लाभार्थी या महिला आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

“आदिवासी भागातील PESA कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक”; Cm Eknath Shinde यांची ग्वाही

Congress ला मोठा मिळणार फटका; JItesh Antapurkar करणार BJP मध्ये एन्ट्री

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version