JEE-Advance चा निकाल जाहीर

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) तर्फे आज संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advanced 2022) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

JEE-Advance चा निकाल जाहीर

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) तर्फे आज संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advanced 2022) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. निकालासोबत जेईई अँडव्हान्स २०२२ ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली. उमेदवार लॉगिन क्रेडेंशियल्स- ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड वापरून JEE Advanced 2022 फायनल आंसर की देखील ऍक्सेस करू शकतात. २८ ऑगस्ट रोजी झालेल्या JEE Advanced 2022 साठी १. ५६ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

निकाल असा डाउनलोड करा

कटऑफ सामान्य श्रेणीसाठी विषयनिहाय १० टक्के, सरासरी ३५ टक्के आणि OBC आणि EWS श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी विषयानुसार ९ टक्के आणि सरासरी ३१.५ टक्के आहे. तर, एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय ५ टक्के आणि सरासरी १७.५ टक्के आहे. मागील वर्षी खुल्या प्रवर्गातील सरासरी कट ऑफ १७.५०, विषयनिहाय ५ टक्के, OBC आणि AWS ची सरासरी १५.७५ आणि विषयानुसार ४.५० टक्के, SC आणि ST आणि PH श्रेणीची सरासरी कट ऑफ ८.७५ आणि विषयानुसार २. ५० टक्के होती. JEE-Advanced Information Bulletin नुसार, विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत समाविष्ट करण्यासाठी विषयवार आणि सरासरी दोन्ही कटऑफ आधीच घोषित करण्यात आले आहेत

 

हे ही वाचा:

अरुण गवळीच्या पत्नीची सुटका नाहीच, ‘या’ प्रकरणी सत्र न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार

‘ … जे पेरलंय, ते उगवतंय’, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा खोचक टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Time Maharashtra |Marathi news

Exit mobile version