spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

JEE Mains 2023 Exam : JEE मेन २०२३ परीक्षेच्या तारखा NTA लवकरच करणार जाहीर

JEE Mains २०२३ परीक्षा ही जानेवारी आणि एप्रिलमध्ये वर्षातून दोनदा घेतली जाईल. यावर्षी, या परीक्षेच्या रजिस्ट्रेशन तारखेबद्दल लवकरच अधिकृत सूचना करण्यात येणार आहे.

JEE Mains २०२३ परीक्षा ही जानेवारी आणि एप्रिलमध्ये वर्षातून दोनदा घेतली जाईल. यावर्षी, या परीक्षेच्या रजिस्ट्रेशन तारखेबद्दल लवकरच अधिकृत सूचना करण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच JEE मेन २०२३ परीक्षेची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. NTA कडून JEE २०२३ परीक्षेची तारीख jeemain.nta.nic.in आणि nta.nic.in वर सूचित केली जाईल.

विभाग A हा अनिवार्य असेल, एकाधिक निवड प्रश्न (MCQs) असेल तर विभाग B मध्ये असे प्रश्न असतील ज्यांची उत्तरे संख्यात्मक मूल्यांच्या स्वरूपात भरली जातील. A विभागातील प्रत्येक बरोबर उत्तरासाठी चार गुण दिले जातील. तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. विभाग B मध्ये, उमेदवारांना दिलेल्या १० पैकी कोणतेही पाच प्रश्न विचारायचे आहेत. विभाग B साठी कोणतेही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

जेईई मेन २०२२ मध्ये प्रति सत्र ९.५ लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. जेईई मेन २०२३ मध्ये अशाच संख्येने विद्यार्थी परीक्षेस बसण्याची अपेक्षा आहे. 2022 मध्ये, २४ उमेदवारांनी १०० पर्सेंटाइल आणि रँक-१ सह परफेक्ट स्कोर मिळवला होता. जेईई मुख्य परीक्षा २०२३ फॉर्म जारी करण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु असे मानले जाते की, यावेळी देखील परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. पहिले सत्र जानेवारीत तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाईल. दोन्ही सत्रातील उमेदवारांचे गुण चांगले असतील तरच ते अंतिम मानले जातील.

NTA त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर JEE मुख्य अर्ज फॉर्म २०२३ जारी करेल. दरम्यान, या परीक्षेबाबत विद्यार्थी सोशल मीडियावर बरेच प्रश्न विचारत आहेत. येथे, JEE Mains २०२३ चे परीक्षार्थी परीक्षेची तारीख, पात्रता आणि इतर माहितीबाबत विचारत आहेत.

हे ही वाचा :

EWS Reservation : आर्थिक आरक्षणाच्या लाभार्थींना मोठा दिलासा, १० टक्के आरक्षण वैधच

Bigg Boss marathi 4: बिग बॉसच्या घरातील कॉमन मॅन झाला आउट; त्रिशूल मराठेने घेतला घराचा निरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss