Tuesday, September 24, 2024

Latest Posts

JioBook Price : स्वस्तात लॅपटॉप खरेदी करायचा विचार करताय?, तर नक्की पहा JioBook कमी किंमतीत 

Jio ने दिवाळीच्या मुहूर्तावर एक नवीन डिव्हाइस लॉन्च केले आहे. कंपनीने अधिकृतपणे पहिला लॅपटॉप लॉन्च केला आहे. याआधीही JioBook ची माहिती समोर आली होती, मात्र कंपनीने अधिकृतपणे काहीही सांगितले नव्हते. हा लॅपटॉप अतिशय वाजवी दरात येतो आणि 4G LTE ला देखील सपोर्ट करतो

तीन महिन्यात लॅपटॉप बाजारात येणार

रिलायन्स जिओकडे भारतातील 420 दशलक्ष ग्राहकांसह भारतातील सर्वात मोठे टेलिकॉम नेटवर्क आहे. रॉयटर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लॅपटॉप लवकरच देशातील शाळा आणि सरकारी संस्थांसाठी उपलब्ध होणार आहे. येत्या तीन महिन्यांत तो बाजारात येण्याची शक्यता आहे.

काउंटरपॉइंट विश्लेषक तरुण पाठक यांनी सांगितले की, भारतीय बाजारपेठेत JioBook लॅपटॉप लॉन्च केल्याने लॅपटॉपची मागणी 15 टक्क्यांनी वाढू शकते. Jio लॅपटॉपची स्वतःची JioOS ऑपरेटिंग सिस्टम असेल आणि JioStore वरून अॅप्स डाउनलोड करण्याची सुविधा असेल. रिसर्च फर्म IDC च्या मते, गेल्या वर्षी भारतात एकूण वैयक्तिक संगणक शिपमेंट 14.8 दशलक्ष युनिट्स होते, ज्यात HP, Dell आणि Lenovo च्या संगणकांचा समावेश आहे.

सर्वात स्वस्त लॅपटॉप 

बाजारात सध्या कमीत कमी 20 हजार रूपयांपासून लॅपटॉपच्या किमती आहेत. परंतु, रिलायन्सचे हे लॅपटॉप 15 हजार रूपयांना मिळणार आहे. त्यामुळे रिलायन्सचा हा लॅपटॉप सर्वात स्वस्त असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.

Latest Posts

Don't Miss