Justice DY Chandrachud : न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश, ४४ वर्षानंतर वडिलांची जबाबदारी पुत्रावर

Justice DY Chandrachud : न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश, ४४ वर्षानंतर वडिलांची जबाबदारी पुत्रावर

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे देशाचे नवे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी,उपराष्ट्रपती जगदीप धनखर, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असेल.

चंद्रचूड २००० मध्ये पहिल्यांदा न्यायाधीश बनले

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांची प्रथम न्यायाधीश म्हणून २००० साली मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी ते १९९८ ते २००० पर्यंत भारत सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते. त्यांनी १९८२ मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. त्यांनी प्रतिष्ठित हॉवर्ड विद्यापीठातही शिक्षण घेतले.

 

हेही वाचा : 

Dipali Sayyad : दीपाली सय्यद आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर; भेटीआधीच शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही काम केले

कोविडच्या काळात त्यांनी ऑक्सिजन आणि औषधांच्या उपलब्धतेबाबत अनेक आदेश दिले. एक प्रसंग असाही घडला की, जेव्हा ते स्वतः कोरोनाग्रस्त असूनही त्यांच्या घरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभागी झाले होते. अलीकडेच त्यांनी रात्री ९.१० वाजेपर्यंत न्यायालयीन कामकाज चालवले आणि त्यादिवशी त्यांच्यासमोरील सर्व खटले निकाली काढले.

वडिलांचा कार्यकाळ सर्वात मोठा

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला असून त्यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सुमारे सात वर्षे आणि चार महिने मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले, सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील CJI चा त्यांचा सर्वात मोठा कार्यकाळ होता. २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ पर्यंत ते सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी राष्ट्रीय राजधानीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात BA ऑनर्स केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी केले. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल, यूएसए मधून LLM आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली.

Sanjay Raut Bail : संजय राऊतांच्या जामिनावर आज निर्णय, ठाकरेंची तोफ तुरुंगाबाहेर येणार का?

न्यायमूर्ती चंद्रचूड यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह सर्व मूलभूत अधिकारांची जाणीव आहे. राजकीय आणि वैचारिक दृष्ट्या भिन्न टोकांवर उभ्या असलेल्या लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांनी असाच आदेश दिला. म्हणजेच केवळ मत मांडण्यासाठी एखाद्याला तुरुंगात टाकणे योग्य नाही. लष्करात कायमस्वरूपी कमिशनसाठी दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनाही त्यांनी दिलासा दिला. न्यायमूर्ती चंद्रचूड हे अयोध्या खटल्याचा निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचे सदस्य होते. आधार प्रकरणाचा निकाल देताना त्यांनी गोपनीयतेला मूलभूत अधिकार म्हणून घोषित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Ashok Chavan : भारत जोडो यात्रेत चव्हाणांचा लेकीचं लाँचिंग; श्रीजयाचे नांदेडमध्ये बॅरन झळकले

Exit mobile version