spot_img
Tuesday, September 10, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मोदी तेरी कब्र खुदेगी’…कंगनाकडून Vinesh Phogat च्या विजयावर उपरोधिक शुभेच्छा

हिंदुस्तानच्या मुलीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. विनेश फोगटने (Vinesh Phogat) भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला म्हणून कुस्तीगीर होण्याचा मान मिळवला आहे. कुस्तीपटू महिला विनेश फोगाटने मंगळवारी 50 किलो वजनी गटात कमालीच प्रदर्शन करून दाखवलं. विनेशने मंगळवारी क्यूबाच्या पॅन अमेरिकन विजेत्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा एकतर्फी लढतीत गुणांवर 5-0 असा पराभव केल्याचं पाहायला मिळालं. भारताचं स्पर्धेतील चौथं पदक विनेश फोगटच्या या कामगिरीने निश्चित झालं आहे. विनेशच्या कमालीच्या आत्मविश्वासाने मॅटवर उतरलेल्या विनेशची देहबोली तिन्ही लढतीत अतिशय सकारात्मक होती. हा विजय हासील केल्यानंतर संपूर्ण देशभरातून विनेशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विनेशने हा विजय मिळवून फक्त पॅरिस ऑलिम्पिकमध्येच पदक निश्चित केलेलं नाही, तर ती गोल्ड मेडल जिंकण्यापासून फक्त आणि फक्त एक पाऊल दूर आहे. आता अशातच बॉलीवूडची क्वीन आणि खासदार कंगना राणौत (Kangna Ranaut) हिने विनेश फोगटच्या विजयानंतर एक पोस्ट शेअर केली आणि हीच पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खासदार कंगना हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहत विनेशला शुभेच्छा तर दिल्याचं, मात्र कुस्तीगीरांच्या आंदोलनावरून कंगना हिने तिच्या अंदाजात टोमणाही मारला.

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये विनेशचा फोटो पोस्ट केला आणि त्यावर तिने लिहिलंय की, भारतामधील पहिल्या सुवर्णपदकाची अशा आहे. एकेकाळी कुस्तीगीरांच्या आंदोलनात विनेश फोगट सहभागी झाली होती आणि ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’च्या घोषणा दिल्या होत्या. तरीसुद्धा तिला देशाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी, प्रशिक्षक, सर्वोत्तम प्रशिक्षण, आणि सोयीसुविधा देण्यात आल्या. महान नेत्यांचं आणि लोकशाहीचं हे सौंदर्य आहे.’

नेमकं प्रकरण काय आहे?

कुस्तीपटूंनी गेल्याचं वर्षी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला होता. ब्रजभूषण शरण हे कुस्ती संघाचे अध्यक्ष होते यांच्यावर आरोप करण्यात आला होता की त्यांनी सहा महिला कुस्तीगीरांचं शोषण केलं आहे. या मुद्द्यावरूनचं कुस्तीपटूंनी जोरदार आंदोलन आणि निदर्शनं केली होती. त्याचवेळी विनेश फोगटने तिचे सर्व मेडल्स आणि पुरस्कार आणून रस्त्यावर ठेवले होते. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वारंवार भेट घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर ही मागणी मान्य न झाल्याने तिने मोदींविरोधात घोषणाबाजीही केली होती.

लढाई अस्तित्वाची ..

विनेशला पहिल्या 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत 48 किलो वजनी गटातून खेळताना दुखापतीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर विनेश 2020 टोक्यो स्पर्धेत 53 किलो वजनी गटात नवव्या स्थानावर राहिली होती. यासर्वातच मानसिक दडपण आणि स्पर्धेदरम्यान झालेल्या अंतर्गत कलहाचा विनेशच्या कामगिरीवर फार परिणाम झाला होता. यंदा विनेशला तयारीपासूनच संघर्ष करावा लागला होता. मॅटबाहेरील अस्तित्वाची लढाई लढत असतानाच विनेशने वजनी गट बदलावं लागल्याचं आव्हानही पेललं.

हे ही वाचा:

केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचा CM Shinde यांचा निर्णय, शिक्षकांना जुनी पेन्शनसंदर्भात समिती स्थापन

रणझुंजार अस्तित्वाची तुतारी फुंकणार….Sharad Pawar यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष, काय असणार महत्त्वाची घोषणा?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss