अमेरिकेतल्या Kauai island या बेटावर आहे शिवलिंग आणि एकमेव रूद्राक्षांचे वन

हवाईतील बेटांमध्ये कौवाई या बेटाचा खास उल्लेख केला जातो. हा बेट तेथील सुंदर निसर्गासाठी ,शिव, गणेश व कार्तिकेयाच्या दाक्षिणात्य बांधणीच्या मठासाठी व अमेरिकेतील एकमेव रूद्राक्षांच्या (Rudraksha) वनासाठी प्रसिद्ध आहे.

अमेरिकेतल्या Kauai island या बेटावर आहे शिवलिंग आणि एकमेव रूद्राक्षांचे वन

हवाईतील बेटांमध्ये कौवाई या बेटाचा खास उल्लेख केला जातो. हा बेट तेथील सुंदर निसर्गासाठी ,शिव, गणेश व कार्तिकेयाच्या दाक्षिणात्य बांधणीच्या मठासाठी व अमेरिकेतील एकमेव रूद्राक्षांच्या (Rudraksha) वनासाठी प्रसिद्ध आहे. कौवाई ही हवाईची राजधानी असल्याने या ठिकाणी संपूर्ण शहरीकरण करण्यात आलेले आहे. हे एक कमी शहरीकरण झालेले हे एक बेट आहे.

हवाईत ज्वालामुखीचे (Volcano) व हिरव्या, अनोख्या लाल, काळ्या व हिरव्या रंगाच्या वाळूच्या समुद्र किनाऱ्यांचे – बिग आयलँड, त्याच्या हिलो या राजधानीत केवळ दहाबारा मजली इमारती (buildings) आहेत. तर कोना या शहरात मोजक्या उंच इमारती दिसतात.तर कौवाई या बेटावर एकही उंच इमारत नाही. सर्वत्र एक अथवा दोन मजली इमारती व घरे पाहायला मिळतात. अवतीभोवती उंचउंच पर्वतरांगा, जंगलातून वळत घेत जाणारे रस्ते व त्यांच्याशी संगत करणारा प्रशांत महासागर. याठिकाणी तुम्ही कुठेही गेलात तरी निसर्ग तुमचे स्वागत करत असतो. नागमोडी वळणे (zigzag turns) घेत जाणाऱी वायलुआ नदी, तिच्यात शांतपणे विहार करणाऱ्या कॅनोज व अन्य नौका हे आणखी एक अनोखे दृश्य आहे.

येथे श्वेतवर्णीय सद्गुरू शिवाय सुब्रमण्यस्वामी यांनी स्थापन केलेले मंदिर (Temples) आहे, हे मंदिर (Temples) तेथील कायमचे आकर्षण आहे. या मंदिरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे, अमेरिकेतील रूद्राक्षांच्या वृक्षांचे एकमेव वन (Forest)आहे . त्यात सुमारे सव्वाशे झाडे आहेत. शेजारच्या ऋषी खोऱ्यातून (ऋषी व्हॅली) खळखळ वाहणारे अनेक झरे आपल्याला दिसतात. तसेच येथे चॉकलेटी व निळ्या रंगांच्या रूद्राक्षांचा व लाल चुटुक पानांचा पडलेला सडा सर्वत्र दिसतो. कौआई हे बेट होनोलुलुपासून विमानाने २० मिनिटांवर आहे. कौवाईतील सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी येथे बरीच गर्दी आढळते.

हे ही वाचा:

Nilesh Rane यांचा Supriya Sule यांच्यावर हल्लाबोल, जास्त हसून बोलणारी लोकं…

कॅनडानंतर आता लंडनमध्ये Khalistan समर्थकांची रॅली, भारताविरुद्ध नवे षड्यंत्र!

अजित पवार गद्दार… दिल्लीत पोस्टरबाजी, थोरल्या पवारांचे पुढचं पाऊल काय असणार सर्वांचं लक्ष…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version