spot_img
Tuesday, September 24, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Keral: केरळमधील नरबळी घटनेशी संबंधित धक्कादायक गोष्ट आली समोर, संशयित नरभक्षक असल्याचा पोलिसांचा संशय

दोन महिलांची अंधश्रध्देच्या आहारी जाऊन हत्या केल्याचा आरोप असलेल्या केरळमधील जोडप्याने कदाचित त्यांच्या बळींचे मांस खाल्ले असावे, असे धक्कादायक नवीन तपशील समोर आल्याचे पोलिसांनी आज सांगितले.

त्वरीत श्रीमंत होण्यासाठी धार्मिक विधी “मानवी बलिदाना” मध्ये दोन महिलांची अंधश्रध्देच्या आहारी जाऊन हत्या केल्याचा आरोप असलेल्या केरळमधील जोडप्याने कदाचित त्यांच्या बळींचे मांस खाल्ले असावे, असे धक्कादायक नवीन तपशील समोर आल्याचे पोलिसांनी आज सांगितले.

पीडित रोसेलिन आणि पद्मा यांना गळा दाबण्यापूर्वी बांधून त्यांचा छळ करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. महिलांचे स्तन कापले गेले आणि रक्त बाहेर वाहू दिले. एका मृतदेहाचे ५६ तुकडे करण्यात आल्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले. हे तुकडे मृतदेह पुरलेल्या खड्ड्यांतून सापडल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्य आरोपी मुहम्मद शफी आहे, ज्याचे वर्णन “लैंगिक छळाच्या आहारी गेलेला एक विकृत” म्हणून केले जाते. ज्याने महिलांना भगवल सिंग आणि त्याची पत्नी लैला यांच्या घरी आणले. शफी २०२० च्या एका ७५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता.

शफीने पीडितांना एका अश्लील चित्रपटात काम करण्यासाठी पैसे देण्याचे वचन दिले होते. त्याच वेळी त्याने भगवल सिंग आणि लैला यांना त्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी मानवी बलिदान करण्याचा “सल्ला” दिला, असे पोलिसांनी सांगितले.

कोचीचे पोलीस प्रमुख सीएच नागराजू म्हणाले, “आरोपींनी पीडितेची हत्या केल्यानंतर शरीराचे काही भाग खाल्ले असण्याची शक्यता आहे. याचा तपास सुरू आहे, परंतु अद्याप पुष्टी झालेली नाही.”

भगवल सिंग, सोशल मीडियावर चांगली फॉलोईंग असणारा मसाज थेरपिस्ट आणि हिलर आहे. तसेच तो राज्याच्या सत्ताधारी सीपीआय(एम) शी संबंधित असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. पण, पक्षाने मात्र तो सदस्य असल्याचे नाकारले आहे.

“तो आमच्यासोबत काम करत होता पण आमच्या पक्षाचा सदस्य नव्हता. तो एकेकाळी पुरोगामी माणूस होता, पण त्याच्या दुसऱ्या लग्नानंतर तो धार्मिक व्यक्ती बनला. कदाचित त्याच्या पत्नीचा प्रभाव असेल,” असे सीपीआयचे पीआर प्रदीप म्हणाले.

रोझेलिन जूनमध्ये बेपत्ता झाली, असे पोलिसांनी सांगितले आणि पद्मा सप्टेंबरमध्ये. या हत्येचा शोध लागल्यावर पोलीस पद्मा बेपत्ता झाल्याचा तपास करत होते. महिलांचे फोन शफीकडे ट्रेस करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज आणि त्याने सोडून दिलेल्या कारच्या मदतीने त्याचा माग काढण्यात आला. तपासामुळे पोलिस आरोपींच्या पठाणमथिट्टा येथील घरात पोहोचले जेथे भगवल सिंग आणि त्यांच्या पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली.

शफी हा “लैंगिक छळ करणारा, मनोरुग्ण किलर आहे” आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी देखील आहे. नागराजू म्हणाले की, शाळा सोडलेल्यांनंतर त्याला लैंगिक विकृतीचे व्यसन होते आणि तो तेव्हापासून “क्रूरतेमध्ये ” आनंद शोधू लागला होता. सोशल मीडियावर संपर्क साधल्यानंतर शफीने महिलांना आमिष दाखविल्याचे समजते.

“मुख्य आरोपी शफी हा एक विकृत आहे. आणखी असे आरोपी आहेत का आणि अशी आणखी काही प्रकरणे घडली आहेत का याचा आम्ही तपास करत आहोत.” नागराजू म्हणाले.

हे ही वाचा:

Keral: अंधश्रद्धेपोटी डॉक्टर दाम्पत्याने दिला दोन महिलांचा बळी, भयानक घटनेचा पोलिसांनी केला खुलासा

COVID-19: नव्या व्हेरियंटमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss