खानदेशी शेतकऱ्याने केली CM Eknath Shinde यांच्याकडे नवी मागणी ; तो व्हिडीओ सोशिअल मीडियावर व्हायरल

१ जुलैपासून या योजनेची अंमलबजावाणी करण्यात आली. यासंदर्भात राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या गेल्या. काही ठिकाणी या योजनेचे अर्ज देण्यासाठी काही ठिकाणी शुल्क आकारल्याचे निदर्शनास आले आहे. 

खानदेशी शेतकऱ्याने केली CM Eknath Shinde यांच्याकडे नवी मागणी ; तो व्हिडीओ सोशिअल मीडियावर व्हायरल

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. आज विधिमंडळ पाचवा दिवस आहे. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने या अर्थसंकल्पात अनेक घोषणा देण्यात आल्या.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Behna Yojana), मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेची अंमलबजावाणी करण्यात आली. यासंदर्भात राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या गेल्या. काही ठिकाणी या योजनेचे अर्ज देण्यासाठी काही ठिकाणी शुल्क आकारल्याचे निदर्शनास आले आहे.

याच पार्श्वभूमीवर अनेक नवे व्हिडीओ, रील्स मोठ्याप्रमाणावर पसरत आहे  किंवा वायरल होत आहेत. त्यापैकीच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. एका शेतकऱ्याने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेवर भाष्य केले आहे. “मुख्यमंत्री साहेब, लाडका मेव्हणा योजना सुरू करा” अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. जळगावमधील एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक शेतकरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेबद्दल भाष्य करताना दिसत आहे. त्याने एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना साद घातली आहे.

नेमका काय बोलला तो शेतकरी राजा : 

मुख्यमंत्री साहेब बहिणींसाठी तुम्ही खूप चांगली योजना सुरु केली. मग मेव्हण्यांसाठी पण अशीच योजना सुरु करा ना… मेव्हण्यांनी तुमचं काय घोडं मारलं आहे. मुख्यमंत्री साहेब त्यांनाही हजार पाचशे रुपये द्या, अशी मागणी एका शेतकऱ्यांना दिले आहे. हा व्हिडीओ जळगावातील एका खानदेशी शेतकऱ्याचा आहे. यात हा शेतकरी खानदेशी या बोली भाषेतून मुख्यमंत्र्यांकडे आपलं मागणं मांडत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खानदेशी बोली भाषेतल्या शेतकऱ्याच्या व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेवरुन या खानदेशी शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साद घातली आहे.

हे ही वाचा:

VIDHAN PARISHAD ELECTION : ज्येष्ठ नेत्यांनी PANKAJA MUNDE यांना दिला बुस्टर डोस ; अर्ज भारण्यापूर्वी माध्यमांशी साधला भावुक संवाद

THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version