विशाल देशाच्या नावांचा आहे अद्भुत इतिहास

. भा म्हणजे ज्ञानाचा/विद्येचा प्रकाश आणि रत म्हणजे पसरवणारा/वाहून घेतलेला-

विशाल देशाच्या नावांचा आहे अद्भुत  इतिहास

भारत" हे एक संस्कृत नाव आहे

भारत देश विविधतेत एकतेच प्रतीक असणारा देश पण याच देशाला विविध नावांनी देखील ओळखले जाते. काहींसाठी हा भारत आहे, काहींसाठी हिंदुस्तान तर काहींसाठी इंडिया. पण, भारताला ही नावं मिळाली तरी कशी? यामागचा नेमका इतिहास तरी काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत.

सिंधू हि नदी भारताच्या प्राचीन इतिहासातील एक फार मोठा घटक आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा तीन नागरी संस्कृतींपैकी एक असणारी “हरप्पा-मोहोन्द्जोरो” संस्कृती याच सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झाली. त्यामुळे भारताला ओळख मिळाली ती या सिंधू नदीमुळे. त्या काळी हरप्पा संस्कृतीसह नांदत होती ती ग्रीक संस्कृती ग्रीक लोकांनीच या सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांचे नामकरण केले इंडोई केले. “इंडोई म्हणजेच इंडस नदीच्या खोऱ्यात राहणारे लोक” आणि म्हणून या हरप्पा संस्कृतीचे “इंडस सिव्हिलायझेशन” असे नाव पडले आणि त्यानंतर सिंधू नदीच्या पलीकडील प्रदेश असणाऱ्या भारताला इंडिया हे नाव पडले.

त्यानंतर पर्शियन लोकांनी याच सिंधू नदीच्या खोऱ्यातील लोकांना “हिंदू” नाव दिले. यावरूनच येथील वैदिक धर्माला “हिंदू” हे नाव मिळाले. याच इतिहासाचा आधार घेऊन स्वा. सावरकर ‘सहा सोनेरी पाने’ मध्ये म्हणतात, कि हिंदू या शब्दामध्ये केवळ धर्म प्रतीत होत नाही तर राष्ट्रीयत्व सुद्धा प्रतीत होते. तेंव्हा तुम्हाला आता कळले कि भारताला “इंडिया” हे नाव प्राचीन इतिहासापासून सिंधू नदीवरून पडले आहे आणि याच नावावरून “हिंदू” हेही नाव पडले आणि त्यानंतर भारताला हिंदुस्थान असे म्हटले जाऊ लागले.

आपण भारतीय आपल्या प्रिय राष्ट्राला “भारत”असे म्हणतो. हे नाव “भरत” राजावरून पडले आहे. भरत म्हणजे राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा सुपुत्र- महाकवी कालिदासाचे शाकुंतल हे नाटक याच भरताच्या जन्म कहाणीवर आधारित आहे. राजा भरताचे मूळ नाव “सर्वदमन” असे असून, महाभारतानेच त्याचे नाव भरत असे ठेवले. हा भरत राजा कुरु आणि पंडू वंशाचा पूर्वज आहे, म्हणूनच व्यासांनी या वंशांच्या इतिहासावर आधारित महाकाव्याला “महाभारत” असे नाव दिले. थोडक्यात”भारत” हे एक संस्कृत नाव आहे. भा म्हणजे ज्ञानाचा/विद्येचा प्रकाश आणि रत म्हणजे पसरवणारा/वाहून घेतलेला- म्हणजेच भारत म्हणजे “ज्ञानाच्या प्रकाशाने अंधाराचा विनाश करणारा देश.

हे ही वाचा:

देशाच्या बर्फाच्छादित डोंगररांगांपासून ते समुद्राच्या तळापर्यंत फडकला तिरंगा

Exit mobile version