जाणून घ्या आजच्या काळातील ओझोन थराचे महत्त्व

पुनरुज्जीवन: महासागरासाठी सामूहिक कृती ही आहे.

जाणून घ्या आजच्या काळातील ओझोन थराचे महत्त्व

आपण सर्व जमिनीवर राहत असलेल्या सजीव प्राण्यांना आज जिवंत राहण्यासाठी आँक्सिजनची गरज असते.पण आँक्सिजन पेक्षा देखील अशी एक गोष्ट आहे जी आपल्या सर्वासाठी खुप महत्वाची आहे.ती म्हणजे ओझोन वायु म्हणुन आपण पृथ्वीवरील सर्व लोक ओझोन वायुचे रक्षण करण्यासाठी तसेच त्याविषयी जनजागृती करण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी ओझोन दिवस देखील साजरा करत असतो.ज्यात आपल्याला पर्यावरण विभागाकडुन ओझोन वायुचे महत्व पटवुन दिले जाते.त्याच्या संरक्षणासाठी प्रेरित केले जाते.

ओझोन म्हणजे काय?

ओझोन हा पृथ्वीवरील वेगवेगळया वायुमंडळांमधील एक थर आहे. ओझोन हा एक असा वायु आहे जो वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आपल्याला आढळुन येत असतो. ह्या ओझोन वायचे रासायनिक सुत्र पाहावयास गेले तर ते ०३ असे असलेले आपणास दिसुन येते.

ओझोन थर हा सुर्याच्या सुर्यकिरणांना पृथ्वीवर येण्यापासुन रोखायचे काम करत असतो.कारण सुर्यापासुन निघत असलेले सुर्यकिरण हे इतके घातक असतात की ते जर आपल्या शरीरावर पडले तर आपल्याला कर्करोग देखील होऊ शकत असतो.त्यामुळे ओझोन वायु हा सुर्यापासुन निघत असलेल्या किरणांना एकमेकांपासुन वेगळ करतो जेणेकरून त्यांचा प्रभाव होईल जेणेकरून आपल्याला त्याच्यापासुन काही हानी पोहचत नसते.

आज जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीच्या तापमानामध्ये आपल्याला खुपच वाढ होताना दिसुन येते आहे.ह्याचमुळे हवामानामध्ये देखील आपल्याला बदल घडताना आज दिसुन येतो आहे.याचा पर्यावरणावर तसेच पृथ्वीवरील ओझोन थरावर खुपच विपरीत परिणाम आज घडताना आपल्याला दिसुन येते आहे.सुर्यापासुन निघालेली किरणे जमीनीवर पडल्याने अचानक पृथ्वीच्या वातावरणामधील तापमानात वाढ होते आहे.अवेळी पुर वादळे येता आहे.अशा अनेक संकटांना आज आपणास तोंड द्यावे लागते आहे.

ओझोन दिवस कधी आणि केव्हा साजरा केला जातो ?
दर वर्षी संयुक्त राष्ट संघाच्या पर्यावरण विभागाकडुन १६ सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो.

जागतिक ओझोन दिवस २०२२ ची थीम

पुनरुज्जीवन: महासागरासाठी सामूहिक कृती ही आहे.

१६ सप्टेंबरला जगभर ओझोन दिन का साजरा केला जातो ?

सुर्यापासुन निघत असलेली अतिनिल सुक्ष्म किरणे आज पृथ्वीवर पडल्याने अचानक तापमानात वाढ होणे,अवेळी पुर तसेच वादळ येणे,सुर्यापासुन निघत असलेले किरण आपल्या शरीरावर पडल्याने कर्करोग होणे तसेच इतर सजीव प्राण्यांना हानी पोहचणे असे विपरीत परिणाम आज घडताना आपणास दिसुन येते.

हे सर्व विपरीत परिणाम रोखण्याचे काम ओझोन वायु करत असतो.कारण ओझोन वायु हा पृथ्वीपासुनच काही अंतरावर असल्यामुळे तो वाटेतच सुर्यापासुन निघत असलेल्या अतिनील सुक्ष्म किरणांना शोषुन घेत असतो.तसेच त्यांना एकमेकांपासुन वेगळ करून त्यांचा प्रभाव कमी करत असतो.ज्यामुळे सजीवसृष्टीचे प्राण वाचत असतात त्यांचे संरक्षण होत असते.

म्हणजेच सर्व पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे प्राण हा एक वायु वाचवण्याचे काम करतो.पण काही कारणास्तव हा ओझोन वायु पृथ्वीवरून दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.याचसाठी ओझोन वायुच्या संरक्षणासाठी त्याच्या संवर्धनासाठी,ओझोन वायुविषयी जनजागृती करण्यासाठी आपण 16 सप्टेंबर रोजी ओझोन दिन साजरा करत असतो.

हे ही वाचा:

आता सावंवाडी ते कणकवली धावणार ट्रेन? नारायण राणेंनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

उबरसोबतचा कटू अनुभव शेअर करताच हर्ष भोगलेला चाहत्यांनी दिला ‘उबरवर बहिष्कार घालण्याचा सल्ला…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version